मोबाईलनं घडलं-बिघडलं 

अविनाश जाधव, फलटण
Sunday, 2 June 2019

मोबाईलने माणसाचं नातं काहींचं घडवलंय, काहींचं बिघडलंय! 
मोबाईल हा माणसाचा मूलभूत घटक बनत चाललाय अन्‌ माणूस माणसं विसरत चाललाय. 

मोबाईलच्या अति वापरानं वेगळंच आता घडू लागलंय, 
अन्‌ नुकतेच जन्मलेले पोरसुद्धा रिंगटोनसारखं रडू लागलंय. 

लहान-मोठी माणसं सतत मोबाईल नेटमध्ये असतात, 
अन्‌ मोबाईल नसलेल्या माणसांवर अलीकडे लोक हसतात. 

मोबाईलमुळं नवरा-बायकोत नवा वाद पेटवायला, 
अन्‌ चारचौघांत बसणारा माणूस चारचौघांतून उठलाय. 

मोबाईलच्या गाण्याशिवाय तरुणांना प्रवास करता येत नाही, 
अन्‌ मोबाईलशिवाय मनातलं गुपीत सांगता येत नाही. 

भीती एवढीच वाटत आहे की, माणसं चार्जिंगवर जगू लागलीत, 
अन्‌ मेल्यावरती अतृप्त आत्मे मोबाईलभोवती भटकू लागलीत. 

म्हणूनच मोबाईलने माणसांचं नातं काहींचं घडवलं, काहींचं बिघडलंय! 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News