सेनेच्या अग्रलेखातुन डीवचताच मनसेचाही पलटवार; काळे, देशपाडेंचा सेनेवर ट्विटरवार

हर्षल भदाणे पाटील
Saturday, 25 January 2020

दोन झेंड्यावरून सेना, मनसेत शीत युद्ध
गजानन काळे, संदीप देशपांडे यांचा ट्विटरवार

नवी मुंबई - संजय राऊत यांनी दोन झेंडे आणि हिंदुत्वावर वरून मनसेला डिवचताच नवी मुंबई शहर अध्यक्ष यांनी शिवसेनेला चारोळी करत चिमटा काढला आहे. ज्यांनी हिंदुत्वाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाला कायम विरोध केला त्याच अबू आझमी सोबत तुम्ही सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसत आहात. शिवसेनेनं मनसे आणि राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवु नये असं म्हणत गजानन काळे यांनी टीका केली आहे.

 

काळे यांची टीकात्मक चारोळी

साबू आझमी च्या रंगात रंगुनी
बिर्याणीची चव चाखू लागले,
हिंदुत्वाची मशाल खाली ठेवुनी,
ऊपऱ्यांना छाताडावर घेऊन नाचू लागले...
ओळखा पाहु काेण?
#SanjayRaut
#Samna https://t.co/V4Euv4t4Kl

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

हिंदुत्वाचा झेंडा मनसेने फडकवल्यानंतर सेनेने ‘सामना’ च्या अग्रलेखात मनसेवर निशाणा साधला आहे. “एखाद्या राजकीय पक्षाने दोन झेंड्यांची योजना करणे ही गोंधळलेल्या मन:स्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे”, असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मनसेवर केला.

याचप्रमाणे ‘वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्याचां खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्याचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्त्वाचाच आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मनसेवर टीका केली.

मात्र शिवसेना टीका करताच मनसैनिकही आता तुटून पडले आहेत. संदीप देशपांडे यांनीही पलटवार करत ‘आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू,’ अस ट्विट करता टोला लगावला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News