Video:पुण्यात मनसेनं भिक मांगो अंदोलन करत केली 'ही' मागणी

सकाळ (यिनबझ)
Sunday, 19 January 2020

म्हणूनच मनसे नेहमीच चर्चेत असते.  पुण्यातील बिबवेवाडी मधील मनसैनिकांनी असच आगळंवेगळं भीक मांगो आंदोलन केलं.

 पुणे:  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी आगळे वेगळे आणि कल्पक आंदोलन करत असतं आणि म्हणूनच मनसे नेहमीच चर्चेत असते.  पुण्यातील बिबवेवाडी मधील मनसैनिकांनी असच आगळंवेगळं भीक मांगो आंदोलन केलं.  बंद पडलेल्या स्वच्छतागृहांकडे प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेनं स्वच्छतागृहांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

गेली अनेक महिने झाली गंगाधम चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे.  स्वच्छतागृह बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे.  पुरुषांच्या बाबतीत समजू शकतो पण स्त्रियांनी काय करावं असा प्रश्न देखील मनसेनं प्रशासनाला विचारला आहे.  आणि म्हणूनच मनसेना भीक मागो आंदोलन करत स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी या आंदोलनाच्या द्वारे केली आहे.

 

 बिबवेवाडीतील मनसैनिकांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या पत्र लिहली मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते.  म्हणूनच पर्यायी मनसेला आंदोलनाचं हत्यार उपसावे लागल्याचे मनसैनिक सांगतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News