आमदार रोहीत पवारांनी तरुणांना दिला उद्योगमंत्र; वाचा काय म्हणाले... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 June 2020

तरुण उद्योजकांना सवलतीच्या दरात विज, जागा, भांडवल आणि आर्थिक बळ दिले जाणार आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा' असे आवाहन पवार यांनी केले

नगर : 'देशातील व्यापाराचा मोठा हिस्सा चीनी वस्तूंनी काबीज केला. येत्या काही दिवसात चीनी वस्तूंवर आयात कर वाढवला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक वस्तूंची मागणी वाढणार आहे. नव तरुण उद्योजकांनी चीनी वस्तूंना पर्यायी वस्तू निर्माण कराव्या. त्यामुळे ग्राहकांचा कल भारतीय वस्तू खरेदी करण्याकडे असेल आणि स्थानिक बस्तूंची बाजारपेठ निर्माण होईल. ग्राहकांना भारतीय बनावटीच्या स्वस्तात वस्तू मिळतील आणि उद्योजकांचा व्यापार वाढेल' असे मत कर्जत- जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतिने शनिवारी (ता.6) नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिक करण्यात आली.  यावेळी आमदार रोहीत पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या मतांवर सखोल चर्चा करण्यात आली. 

'चीनी वस्तूंचा देशाअंर्तगत व्यापार कमी करण्यासाठी सरकार आयात कर वाढवणार आहे. तरुण उद्योगकांना प्रोत्साहन देण्यासठी सरकारने योजना आखली आहे. त्यानुसार तरुण उद्योजकांना सवलतीच्या दरात विज, जागा, भांडवल आणि आर्थिक बळ दिले जाणार आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा' असे आवाहन पवार यांनी केले. 'रंग रंगोटी, सजावट, प्रकाश दिवे, इलेक्ट्रानिक अशा वेगवेगळ्या चीनी वस्तू दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्या स्वस्त असल्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. अशा स्वस्त चीनी वस्तूंना तरुण उद्योगकांनी पर्यायी वस्तू निर्माण करुन द्याव्या. ग्राहक त्याचे स्वागत करतील असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहर झिरवाळ, रायुकॉंचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राकॉंचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व इतर पदाधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News