या कारणासाठी मंदा म्हात्रे यांचा सिडकोकडे पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

नवी मुंबईतील बरेचसे पालक आपल्या मुलांच्या संगीत प्रेमापोटी मुंबई गाठतात. मात्र, लहान मुलांमध्ये संगीतमय वातावरणाची रुची निर्माण होण्याकरीता संगीत दालन नवी मुंबईत असायलाच हवे. 

नेरूळ : नवी मुंबईत बाल भवन उभारण्यात यावे, याकरिता आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना याबाबत निवेदन दिले. शहरात अनेक बालकलाकारांनी तबलावादन, गायन, हार्मोनियम, बासरी, वीणा आणि संगीतातल्या इतर दुर्मिळ वाद्यांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे.

या बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिल्यास, त्या ठिकाणी ‘बाल भवन’ उभारल्यास या कलाकारांना सोईचे होणार आहे, असे आमदार म्हात्रे यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

नवी मुंबईतील बरेचसे पालक आपल्या मुलांच्या संगीत प्रेमापोटी मुंबई गाठतात. मात्र, लहान मुलांमध्ये संगीतमय वातावरणाची रुची निर्माण होण्याकरीता संगीत दालन नवी मुंबईत असायलाच हवे.

आताच्या घडीला विविध शैक्षणिक संस्थांमुळे नवी मुंबईला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जात आहे. यापुढे ती बालकलाकारांची पंढरी म्हणून ओळखली जायला हवी. बाल भवनाच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकार नवी मुंबईला मिळतील. त्यामुळे शहरातील सिडकोच्या राखीव असलेला भूखंड बाल भवनसाठी देण्यात यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News