प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी या विषयावर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे १६ सप्टेंबरपासून चार दिवसीय परिषद

सलील उरुणकर
Sunday, 13 September 2020

केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एल नरसिंम्हा रेड्डी, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ संजीच चोपडा, लोकसभेचे माजी महासचीव अनुप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अ‍ॅनॅलिसिसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

पुणेः प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने आणि परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरील चार दिवसीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे (मिटसॉग) १६ सप्टेंबरपासून करण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१९ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

परिषदेचे उद्घाटन १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम www.mitsog.org किंवा www.mitwpu.edu.in किंवा www.bharatiyachhatrasansad.org या वेबसाईट वर पाहता येईल, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरु डॉ एन टी राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ शैलश्री हरिदास यांनी दिली.

केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एल नरसिंम्हा रेड्डी, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ संजीच चोपडा, लोकसभेचे माजी महासचीव अनुप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अ‍ॅनॅलिसिसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

युपीएससी परीक्षेत देशात पहिला आलेला प्रदीप सिंग आणि तिसरी आलेली प्रतिभा वर्मा यांचा सत्कार होणार आहे. त्यांना अनुक्रमे ५१ हजार आणि २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या सोहळ्याचा समारोप १९ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल डॉ किरण बेदी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्याम सरन, माजी मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा व माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहतील.

कार्यक्रम पत्रिका

१६ सप्टेंबर

पहिले सत्रः यूपीएससी प्रिलिम

दुसरे सत्रः यशस्वीतांच्या यशाची यशोगाथा

१७ सप्टेंबर

तिसरे सत्रः यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी

चौथे सत्रः यशाचा मंत्र पाचवे सत्रः राज्यातील टॉपरशी संवाद

१८ सप्टेंबर

सहावे सत्रः युपीएससीच्या मुलाखतीची तयारी
सातवे सत्रः युपीएससी व सीएसई परिक्षेचे बदलते स्वरूप समजून घेणे

आठवे सत्रः युपीएसीच्या तयारीसाठी इंटरनेटचा परिणाम, कारणे व उपयोग करून घेणे

१९ सप्टेंबर

नववे सत्रः युपीएससी परीक्षेचे नियंत्रक या विषयांवर भारतातील व महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून आपले विचार मांडतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News