भारताच्या माजी कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 88 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. आता मिताली 2021मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने 88 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. आता मिताली 2021मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 

मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2012 (श्रीलंका), 2014 (बांगलादेश) आणि 2016 (भारत) असे तीन ट्वेंटी20 विश्वकरंडक खेळला आहे.

ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. तिने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्याही आधी 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. मितालीने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 37.52च्या सरासरीने 2364 धावा केल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News