एमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार

यिनबझ प्रतिनिधी
Sunday, 11 October 2020

या सामंजस्य करारामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या कंपन्यामध्ये इंटर्नशिप, रोजगार आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांसोबत औद्योगिक कंपन्यांसोबत प्रत्यक्ष काम करून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे २५ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार

पुणेः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन विभागातर्फे २५ आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यासोबत सामंजस्य करार केले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत सामंजस्य करार करण्याची ही एमआयटी ग्रुपच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

या सामंजस्य करारामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या कंपन्यामध्ये इंटर्नशिप, रोजगार आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांसोबत औद्योगिक कंपन्यांसोबत प्रत्यक्ष काम करून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या सामंजस्य करारांवर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, आयईईई पुणे विभागाचे चेअर गिरीश खिलारी, आयईईई पुणे विभागाचे उप चेअर जगदीश चौधरी, बीएसएनएलच्या आरटीटीसीचे प्राचार्य निलेश वानखेडे, बीएसएनएलच्या आरटीटीसीचे एसडीई नितीन बावस्कर, की साईट टेक इंडिया बेंगलुरूचे जनरल मॅनेजर सुधीर टांगरी, मिल्मन थिन फिल्म सिस्टीम्स, पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. मिलिंद आचार्य, कॉटमॅक इलेक्ट्रॉनिक्सचे सेल्स मॅनेजर गिरीश तोडकर्ये यांच्यासह २५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांद्वारे स्वाक्षरी केली.

यावेळी कुलगुरू यांचे सल्लागार शिवशरण माळी, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, उपप्राचार्य डॉ. वीरेंद्र शेटे, एमआयटी एसओईच्या अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. राहुल मोरे यांच्यासह विविध विभागाचे समन्वयक आणि प्राध्यापक उपस्थित होते.

या सामंजस्य करारामध्ये आयईईई पुणे विभाग, बीएसएनएल पुणे, की साइट टेक इंडिया, बेंगलुरू, मिलमन थिन फिल्म सिस्टिम्स पुणे, कोटमैक इलेक्ट्रॉनिक्स, एज्यु एनर्जी कन्सल्टंट्स एलएलपी सिंगापूर, अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट पुणे, एसपीजे एम्बेडेड टेक, हाय स्पिरीट कमर्शियल वेंचर्स, एनआय लॉजिक पुणे, इलियट सिस्टीम्स पुणे, ट्रायडंट टेक लॅब, एल्मक इंजीनिअरिंग सर्व्हिसेस चेन्नई, वेदम लॅब, सोलापूर, टेक स्मार्ट सिस्टीम्स पुणे, ओम एक्सपोर्ट्स पुणे, बीएम इलेक्ट्रॉनिक्स नाशिक, इलेक्ट्रॉनिक्स स्टडी सेंटर नाशिक, प्रॉस्का इंजीनिअरिंग व ऑटोमेशन, हेफशाईन सॉफ्टवेअर, ऑटोमॅट इंजिनीअरिंग पुणे, यूबीटी टेक्नॉलॉजी पुणे, एएसए टेक्नॉलॉजीस् कल्याण, अ‍ॅक्लिव्हिस टेक्नोलॉजीज पुणे, एनजेक्चर इन मुंबई, पेरी सोल्यूशन्स शिवणे पुणे या कंपन्यांचा समावेश आहे.

दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी आयईईई पुरस्कृत कृषी प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

आयईईई पुणे विभागाचे गिरीश खिलारी म्हणाले, भविष्यात विद्यापीठातून कार्यक्षम रोजगार मिळविण्यासाठी औद्योगिक कंपन्या आणि शैक्षिणक संस्थांनी एकत्र येऊन एक व्यासपीठ तयार करावे. याच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांसोबत औद्योगिक ज्ञान मिळत राहिल. त्यांच्यातील कौशल्य वाढीसाठी याद्वारे मदत होईल.  

डॉ. मंगेश कराड म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम अभियंते निर्मितीसाठी उद्योगांच्या सहकार्याने मदत होईल. या सामूहिक सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि येथील प्राध्यापकांना नवीन तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन आणि इंटर्नशीपच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिकवण मिळणार आहे.

प्रा. डॉ. वीरेंद्र शेटे म्हणाले, तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपनीबरोबर करार झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या अधिक संधी आणि कौशल्य सुधारण्यास मदत होईल. वास्तवातील आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनिका भोयर यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News