बजेट सादर करताना अजित पवारांकडून घडली 'ही' चूक

यिनबझ टीम
Friday, 6 March 2020

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो !
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो !!
लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

मुंबई - आज महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकराने पहिला अर्थ संकल्प सादर केला. यावेळी राज्याला अनेक संकटांचा सामना करत सोबत अनेक आव्हानांना घेऊन पुढे जावं लागणार असल्याचे मत अजित पवारांनी यावेळी मांडले. विधानसभेत अर्थ संकल्प मांडत असताना अनेक योजनांची अजित पवारांनी घोषणा केली मात्र जाता जाता एक चुक अजित पवरांकडून घडली.

अर्थ संकल्प सादर करत असताना विरोधकांवर टिका करण्याची संधी अजित पवारांनी सोडली नाही, त्यावेळी दोन कवितेच्या ओळीदेखील समभागृहात म्हणून दाखवल्या. 

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो !
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो !!
लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

याच्यातून अजित पवारांनी महाराष्ट्र सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आपल्याला त्याला कसे सामोरे जावे लागणार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ही कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचे म्हटल्यानंतर मात्र संपुर्ण सभागृहात त्यांची चुक झाली, असे म्हणत गोंधळ उडाला.

खरतर 6 मे 2018 साली खुद्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत या कवितेच्या लेखकांबद्दल खुलासा केला होता. काही लोक समजत आहेत, की 'कोशिश करने वालों की हार नहीं होती' ही कविता बाबूजी यांनी लिहलेली आहे, मात्र तसं नसून या कवितेचे रचनाकार आहेत सोहन लाल द्विवेदी. असं मत मांडून बच्चन यांनी याबाबत खुलासा केला होता.

AMITABH BACHHAN

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News