'या' महिन्यात मिर्जापूर २ प्रदर्शीत होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

मिर्जापूरचा पहिला भाग २०१८ साली प्रदर्शिक झाला होता. प्रेक्षकांनी या भागाला भरभरुन प्रतिसाद दिला.

ओटीटी प्लॉटफार्मवर मिर्जापूर वेब सिरिजने धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांनी या सिरिजला भरभरुन प्रतिसाद दिला. मात्र काही महिन्यांतर ही सिरिज बंद करण्यात आली. त्यामुळे मिर्जापूरचा दुसरा सिझन केव्हा प्रदर्शिक होणार याची उत्सुक्ता चाहत्यांना लागली होती. ही उत्सुक्ता आता शिगेला पोहचली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात मिर्जापूर २ प्रदर्शीत होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात प्रेक्षकांना मिर्जापूर २ पाहण्याची संधी मिळणार आहे.

 

एक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॉटफार्मवर सप्टेंबरमध्ये मिर्जापूर २ वेब सिरिज पाहायला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. मिर्जापूरचा पहिला सिझन २०१८ साली प्रदर्शिक झाला होता. प्रेक्षकांनी या भागाला भरभरुन प्रतिसाद दिला. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा दोन वर्षापासून प्रेक्षकांना होती. शेवटी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली.

मिर्झापूर २ च्या चित्रिकरणाचे संपुर्ण काम संपले आहे. मिर्झापूर वेब सिरिज मध्ये उत्तर प्रदेशातील अंडरग्राउंड डॉनची कहानी दाखवण्यात आली होती. दोन गटात तुंबळ मारणार, खुन- खराबा, ब्लॉकमेलींग असे विविध प्रकार दाखवण्यात आले, प्रेक्षकांनी याला मोठ्या प्रमाणात पसंदी दिली. यामध्ये पंकड त्रिपाठी, विक्रांत मैस, अली फजल, श्रेता त्रिपाठी आणि इतर कलाकारांनी काम केले.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News