अंतिम वर्षाच्या परीक्षां संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर "हे" आहे मंत्री उदय सामंत यांचं म्हणणं 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020
  • गेल्या अनेक दिवसांपासून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता.
  • त्यानंतर आज २८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने विद्यार्थी, राज्य सरकार आणि यूजीसी यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाबाबत अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई :- गेल्या अनेक दिवसांपासून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. त्यानंतर आज २८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने विद्यार्थी, राज्य सरकार आणि यूजीसी यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाबाबत अंतिम निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच ज्या राज्य सरकारांना आपल्या राज्यात यूजीसीने दिलेल्या गाईडलाईन नुसार ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेणे जमणार नाही त्यांनी यूजीसीला पत्र लिहून परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करायची आहे.

सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या मोठ्या निर्णयावर महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी म्हंटले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात जो निकाल दिला आहे त्याचा आदर सर्वांनाच करावा लागेल. यापुढे ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दोन टप्प्यात दिला असून यातील पहिली महत्वपूर्णबाब म्हणजे यूजीसीने ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घ्यायच्या ज्या गाईल्डलाइन्स दिल्या होत्या त्या राज्य सरकारांना बंधनकारक नसतील. तसेच डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटींनी देशातील राज्यांमध्ये असणारी कोरोना परिस्तिथी लक्षात घेऊन पुन्हा एकदा विचार करून यूजीसीला विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात, कधी घ्याव्यात त्यावर कसा मार्ग काढायचा याविषयी रेकमेंड करायचे आहे अशी एक मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील दुसरीबाब म्हणजे परीक्षा ह्या घ्याव्याच लागतील त्या रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेऊन आणि त्यावर अभ्यास करून महाराष्ट्र सरकार यापुढील निर्णय घेईल. तसेच परीक्षांसंबंधी निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं हित देखील लक्षात घेतल जाईल असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पूर्ण अभ्यास झाल्यावरच याबद्दल आणखी सविस्तर बोलणं उचित ठरेल असे त्यांनी म्हंटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन परीक्षा घेण्यासंदर्भात काय पाऊल टाकते हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News