मंत्री संजय बनसोडेनी घेतला ऑनलाईन क्लास; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 June 2020
  • दयानंद शिक्षण संस्थेतील विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेट दिली.

लातूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दयानंद शिक्षण संस्थेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमास व नव्याने तयार करण्यात आलेल्या क्रिकेट ग्राउंडच्या पाहणीसाठी प्रमुख पाहुणे राज्यमंत्री संजयजी बनसोडे व सहकार महर्षी बी. बी. ठोंबरे हे उपस्थित होते. या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन व अजिंक्यजी सोनवणे यांनी दिली. 

याप्रसंगी संजयजी बनसोडे, पर्यावरण पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सहकार महर्षी बी. बी. ठोंबरे यांनी दयानंद शिक्षण संस्थेतील विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यात खत निर्मिती, सांडपाण्याचे पुर्नवापर प्रकल्प आदी सोबतच दयानंद कला महाविद्यालयात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या ऑनलाईन तासिकांसंबंधी माहिती देण्यात आली.

याप्रंसगी कला महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मंत्री महोदयांसमोर मांडला. यात मायक्रोसॉफ्ट टीम्स या ॲपच्या माध्यमातून इ. 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका चालत असून पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांची इयत्ता बारावीच्या तत्त्वज्ञान विषयाची ऑनलाइन तासिका सुरू होती. या प्रसंगी राज्यमंत्री मा. संजयजी बनसोडे यांनी आॅनलाईन तासिकेत सहभागी कु. कार्तिकी पाठक, इजहार शेख, इम्रान शेख आदि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक आधार देत लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना घरी राहा व सुरक्षित रहा अशा प्रकारचे आवाहन याप्रसंगी केले व दयानंद कला महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. 

याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष संजयजी बोरा, अॅड अशिषजी बाजपाई, मकरंद सावे, अजिंक्यजी सोनवणे, विशालजी लाहोटी, विशालजी अग्रवाल, संस्थेचे इतर मान्यवर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य अनिल कुमार माळी, पयवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. महेश जंगापल्ले, अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव, श्री. रमेश देशमुख, श्री. नंदकिशोर खंडेलवाल आदी कर्मचारी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News