एम आय डी सी रोजगाराचे एक उत्तम साधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) व दूरसंचार क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून, त्या खालोखाल उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत.

उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींपैकी सर्वांत जास्त संधी औद्योगिक क्षेत्रात असून, त्या खालोखाल सल्ला क्षेत्रातील आहेत. 

विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) व दूरसंचार क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून, त्या खालोखाल उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत.
भारतातील कोणत्या शहरात किती नोकऱ्या उपलब्ध होतात, याची सरासरी आकडेवारी बघितल्यास असे लक्षात येते, की देशाच्या राजधानी दिल्लीत सर्वाधिक 
नोकऱ्या उपलब्ध होतात. त्या खालोखाल महाराष्ट्राच्या मुंबई व पुण्यातदेखील नोकरीच्या प्रचंड संधी आहेत.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होतात. 
कुशल मनुष्यबळ, सुरक्षितता, चांगले शैक्षणिक वातावरण, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, सामाजिक सलोखा, हिंजवडी आयटी पार्क, पिंपरी चिंचवडसारखे ऑटोमोबाइल हब, ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट ही ओळख, १५० वर्षे जुने पुणे विद्यापीठ यांसारख्या गोष्टींमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होते व तरुणांना रोजगार मिळतात.

कंपन्या विविध पद्धतीने कर्मचारी मिळविण्याचा प्रयत्न करतात. कॅम्पस प्लेसमेंट, आधीच्याच कर्मचाऱ्यांच्या ओळखीत, जॉब पोर्टल्स तसेच ट्रेनिंग एजन्सीजच्या मार्फत कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. यात कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे प्रमाण सर्वांत जास्त असते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News