MHT CET ने जाहीर केले सुधारित वेळापत्रक; 'या' तारखेला होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

प्रत्येक परीक्षा केंद्वावर 50 टक्क्यांनी विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली. 17 तारखेला 50 टक्के आणि 18 तारखेला 50 टक्क विद्यार्थी परीक्षा देतील असे नियोजन करण्यात आले.

मुंबई : फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट पीजी अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी सीईटी यंदा 17 ऑक्टोबर 2020 ते 18 ऑक्टोबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सोमवारी (ता. 21) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयोगाने 17-18 दोन दिवस परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा काळात शारिरीक अंतराचे नियम पाळता यावे यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले.

प्रत्येक परीक्षा केंद्वावर 50 टक्क्यांनी विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली. 17 तारखेला 50 टक्के आणि 18 तारखेला 50 टक्क विद्यार्थी परीक्षा देतील असे नियोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जाणार आहे. प्रवेश गेटवर थर्मल स्कॉनिक करुन उमेदवारांना परीक्षा केंद्रात सेडले जाईल, विद्यार्थ्यांना मास्क, सॉनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश आयोगाने दिले. फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट पीजी अभ्यासक्रमाच्या पुर्व परीक्षेचे प्रवेशपत्र 1 ऑक्टोबर 2020 पासून उपलब्ध करुण दिले जाणार आहे, 18 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना डाऊनलोड करता येईल आहे, काही दिवसात प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती आयोगाने दिली. 

प्रॅक्टिकल परीक्षा:

दरवर्षी प्रॅक्टिकल आणि जनरल नॉलेज अशा दोन भाग परीक्षा घेतली जायची मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऑब्जेक्ट ड्रॉइंग, डिझाइन प्रॅक्टिकल, मेमरी ड्राइंग आणि जनरल नॉलेज सर्व विषय एकत्रीत करुन एकच परीक्षा आयोजिक करण्यात आली. त्यामुळे गुणांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News