MHT-CET परीक्षा स्थगीत; पालकांच्या मागणीला यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 June 2020
  • उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई  : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यातील पाच लाख 24 हजार 907 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 4 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा उच्चशिक्षण विभागाला पुढे ढकलावी लागली आहे.

सध्या संपूर्ण देशातील आणि राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असे ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News