मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण गजबजलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

खुलताबाद -  मराठवाड्याचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या म्हैसमाळला रविवारी (ता. १४) सुटीनिमित्त औरंगाबाद शहरासह परिसरातील पर्यटकांनी गर्दी केली. म्हैसमाळला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असले, तरी अर्धा रस्ता चांगला झाल्याने वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसले. यात चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश होता.

खुलताबादपासून अवघ्या ११ किलोमीटर  अंतरावर असलेल्या म्हैसमाळला असलेल्या व्ह्यु पॉइंट्‌सवरून निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचबरोबर बालाजी मंदिर, दुरदर्शन मनोरा पाहण्याबरोबरच पर्यटकांनी तळ्याच्या काठी, मोकळ्या माळरानावर बसून डबा पार्टीचा, वनभोजनाचा आनंद घेतला.

म्हैसमाळचा विकास पर्यटन प्राधिकरणातून करण्यात येत आहे. खुलताबाद-म्हैसमाळ रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाल्याने निसर्गप्रेमी, पर्यटकांची चांगलीच सोय झाल्याने वाहने सुसाट धावत आहेत. म्हैसमाळसह खुलताबाद शहराबाहेरील दर्गाह परिसरातही निसर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News