पवईतील तरूण व्यावसायिकाला जातीयता तेढ निर्माण करणारे मेसेज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • सध्या गेली तीन चार महिने झाले कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर संसर्गाने अगोदरच आर्थिक महामारी निर्माण झाली आहे. आजच्या तरुणांनाच्या हाता तोंडाशी आलेला घास ही या महामारी ने हिरावून घेतला आहे.

मुंबई : सध्या गेली तीन चार महिने झाले कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर संसर्गाने अगोदरच आर्थिक महामारी निर्माण झाली आहे. आजच्या तरुणांनाच्या हाता तोंडाशी आलेला घास ही या महामारी ने हिरावून घेतला आहे. चांगल्या पोस्टवर असलेल्या तरुणांना कामावरून रिक्त करण्यात आले आहेत आणि त्यात बेरोजगारी वाढली असता पवईतील एका तरूण व्यावसायिकाने दिड वर्षा अगोदर सुरु केलेल्या प्रतिक सर्विसेस नावाच्या व्यवसायाला जातीय बंधनात बांधून जातीयता तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि सुरळीत चालू असलेल्या व्यवसायाला थांबवण्याचा प्रयत्न गेली बरेच दिवस काही लोक करत आहेत.

एकीकडे शिक्षित तरूण बेरोजगारीचे ओझे डोक्यावर घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोणत्या ना कोणत्या प्रकारे करत आहे. त्यात असेच काही जातीयता तेढ निर्माण करणारे त्यांचा सुरळीत चाललेला व्यवसायात जात,पात,धर्म मध्ये आणून त्यांना उभारणी देण्या ऐवजी आणखी बेरोजगार करण्याच्या वाटेने जाताना दिसत आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जे हे प्राशन करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही आजचा तरुण उच्च शिक्षित आहे त्याला त्याचा उदरनिर्वाह करता येईल इतके ज्ञान आहे. काय बरोबर आणि काय चुकीचे त्याला कळते परंतु असेच काही जातीयता तेढ निर्माण करणारे त्यालाही धुळीस मिळवतात आणि आपलीच बाजू सत्याची ठरवतात.

या जातीच्या नावाखाली आजवर कित्येकांचे प्राण गेले आहेत. त्यात आणखी भर पडू नये अन् बेरोजगारीच्या नैराश्यातून कोणीही चुकीचे पाऊल उचलू नये या करता यावर आळा घालण्यात यावा व भारतीय संविधानात सांगितल्या प्रमाणे मी प्रथमतः भारतीय अन् अंतिमतः ही भारतीय याचे पालन करून सर्व धर्म समभाव पाळत एकजूटीने रोजगार निर्मिती करूया व इतरांना ही रोजगाराची संधी द्यावी.

असे जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज यापूर्वी देखील दोन वेळा मला सोशल मिडिया द्वारे आले होते.परंतु मी त्यावर भाष्य करणे टाळून मी माझ्या व्यवसायात मन लावून काम करत होतो परंतु असले मेसेज काही थांबत नसल्याने जातीयता तेढ निर्माण करणाऱ्याला समज मिळावी व यामुळे कोणाला आपला जीव गमवावा लागू नये या करीता सर्वांना विनंती करतो की व्यवसाय आणि जात याला एकत्र न करता आजच्या बेरोजगार तरुणांना पाठबळ देत चला
- प्रतिक कांबळे (प्रतिक सर्विसेस चे चालक मालक)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News