या कारणामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थी; अकरावीत नापास 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020

अकरावीत पास विद्यार्थ्यांना बारावीचा अभ्यास करता यावा यासाठी ईमेल आणि एसएमएमद्वारे निकाल कळवला आहे. इतर विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारने सर्वच विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश मिळत असल्याचे जाहीर करावे. म्हणजे विद्यार्थी घरात बारावीचा अभ्यास करतील. 

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्क देण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे अकरावीच्या वार्षिक परीक्षा रद्द केल्याने सरासरी गुणांच्या आधारे अकरावीचा निकाल महाविद्यालयांनी जाहीर केला होता. या पध्दतीमुळे अकरावीतील अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ८० टक्के गुण मिळाले होते.  ते विद्यार्थी या पध्दतीमुळे नापास झाले आहेत. त्यामुळे शिक्षण परीषदेने मुख्यमंत्र्यांकडे अकरावीची परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. 

दहावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लागला, तरी प्रवेश प्रक्रिया लांबली जाते. साधारण अकरावीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत चालते. त्यानंतर सुरू झालेल्या परीक्षेमुळे महाविद्यालयाशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांना त्रास होतो. तसेच क्लचरशी जुळवून घेताना विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही. बहुसंख्य विद्यार्थ्यांना काठावर गुण मिळाले आहेत. अकारावीच्या तीन्ही परीक्षांची सरासरी काढली असता,शेकडो विद्यार्थी यंदा नापास झाले आहेत. यावर्षी राज्य सरकारने सर्वच पुस्तके पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिल्याने बारावीचा अभ्यास मुलांना ऑनलाईन करता येईल अशी माहिती ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली. 

अकरावीत पास विद्यार्थ्यांना बारावीचा अभ्यास करता यावा यासाठी ईमेल आणि एसएमएमद्वारे निकाल कळवला आहे. इतर विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारने सर्वच विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश मिळत असल्याचे जाहीर करावे. म्हणजे विद्यार्थी घरात बारावीचा अभ्यास करतील. 

अकरावी परीक्षा प्रकिया वेळेत पूर्ण न झाल्याने विद्यार्थांना अभ्यास पूर्ण करण्यास वेळ मिळाला नाही. सरासरी गुण देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थाचे नुकसान झाले आहे. विद्यार्थी नापास झाल्याने त्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक परिषेदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News