मेमरी लॉस झालेल्यांची मेमरी प्लस करणार: रोहीत पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

आमदार पवारांनी आपल्या दिलखूलास शैलीतून जनतेशी संवाद साधला. त्यांनी अनेक विषयांवर आले मत व्यक्त केले. भविष्यातील काही इच्छा त्यांनी जनतेला सांगितल्या.

'पवार साहेबांवर जनतेचा खूप विश्वास आहे, त्यामुळे आपल्या समस्या घेऊन जनता थेट पवार साहेबांकडे जातात. भेट घेणाऱ्या प्रत्येकाला पवार साहेब नावाने ओळखतात. त्यांच्याकडे प्रचंड बुद्धीमता आहे. तंत्रज्ञानाच्या काळात अशी बुद्धीमता असने खूप महत्त्वाचे आहे. पुर्वी तात्काळ संवाद साधन्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान नव्हते. त्यामुळे पवार साहेबांचे काम गावातील काही मंडळीकडून चालायचे. पवार साहेब त्या गावत गेले की कार्यकर्ते जमा व्हायचे, अशा पद्धतीने साहेबांनी कार्यकर्ते जोडले आहेत. आधुनिक काळात संवादाची विविध माध्यमे आली त्यामुळे अनेकांची मेमरी लॉस झाली. मला ती प्लस करायची आहे' असे मत कर्जत- जामखेडचे तरुण आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.  

औरंगाबाद येथे बुधवारी संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात आमदार रोहीत पवार बोलत होते. आमदार पवारांनी आपल्या दिलखूलास शैलीतून जनतेशी संवाद साधला. त्यांनी अनेक विषयांवर आले मत व्यक्त केले. भविष्यातील काही इच्छा त्यांनी जनतेला सांगितल्या. रोहीत पवारांना क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे त्याच बरोबर मोटारसायकल आणि कार विकत घेण्याचा
छंद आहे. स्वत:ला आवडलेली गाडी आमदार पवार विकत घेतातचं अशी त्यांची ख्याती आहे.

'एक बोलायचं आणि दुसर करायाचं असा माझा स्वभाव नाही, पद, प्रतिष्ठा आली की. काहींना बाऊन्सर ठेवायची आवड असते, तर काहींना काळाप्रमाणे गाड्या बदलण्याची सवय असचे, मला भविष्यात हेलिकॉप्टर घ्यायचं आहे. त्यासाठी मेहणत करण्याची तयारी आहे आणि मेहनत करुन हेलिकॉप्टर घेण्याचा विचार आहे' असे आमदार पवारांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News