मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये रविवारी (ता.12) विद्याविहार ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये रविवारी (ता.12) विद्याविहार ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, विविध अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

रविवारी सकाळी 9.10 ते दुपारी 2.30 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष रेल्वे सेवा माटुंगा ते दिवादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या निर्धारित थांब्यावर थांबतील व पुढे दिवा येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. दिवा येथून सकाळी 9.39 ते दुपारी 2.18 दरम्यान सुटणारी जलद विशेष रेल्वे सेवा दिवा आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावरील निर्धारित थांब्यावर थांबविण्यात येणार आहे. माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News