कोकणातील प्रशासकीय सेवांमध्ये मेगाभरती; स्थानिक तरुणांना प्राधान्य

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Friday, 15 March 2019

कोकणात असलेल्या प्रशासकीय सेवांमध्ये मेगाभरतीसाठी स्थानिकांनी प्राधान्याने अर्ज भरावेत, यासाठी निरंतर कोकण कृती समिती प्रयत्नशील आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष पंकज दळवी यांनी सांगितले की, कोकण विभागासाठी मेगाभरती सुरू झाली आहे. यावर्षी सर्व जागांसाठी स्थानिक तरुण अर्ज भरतील, असा आमचा प्रयत्न आहे. अर्जदारांपैकी स्थानिक तरुणांना परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याची तयारी आम्ही केली आहे. अर्ज भरताना येणाऱ्या समस्यांवर मदत आम्ही मोफत उपलब्ध करू. निरंतर कोकण कृती समिती ही कोकण विभागातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेली समिती आहे.

शासकीय सेवांमध्ये स्थानिकांची संख्या अधिक असावी म्हणून या मेगाभरतीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर इथल्या स्थानिक तरुणांनी अधिकाधिक संख्येने अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. 

दरवेळी कोकण विभागातील भरती प्रक्रियेत इतर महाराष्ट्रातून आलेल्या अर्जदारांचे प्राबल्य असते. यावेळी मात्र चित्र वेगळे असेल, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण इतर विभागातील व्यक्ती पदावर आली तरी काही दिवसांनी ते त्यांच्या गावी बदली करून घेतात आणि कोकणातील जागा पुन्हा रिक्त होतात, म्हणुन खास करून कोकणवासिय तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख २२ मार्च आहे. त्यामुळे अधिकाधिक स्थानिक तरुणांनी अर्जकरून या संधीचा लाभ घ्यावा. समितीच्या वतीने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी व मोफत मार्गदर्शनाची सुविधा घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निरंतर कोकण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

पंकज शोभा दळवी ९७०२१६१६१३ 

विजय मोरे ९६५७०३७७४८

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News