ITI मध्ये 700 पदांची मेगा भरती; अशी होणार निवड प्रक्रीया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 April 2020

देशात रोजगाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 700 पदांची भरती करण्यासाठी सरकारने मान्यता दिली.

मुंबई: लॉकडाऊनमुळे देशातील उद्योग व्यावसाय बंद पडले. कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली, देशात रोजगाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 700 पदांची भरती करण्यासाठी सरकारने मान्यता दिली. लॉकडाऊन संपल्यानंतर दोन महिन्यात ही संपुर्ण भरती प्रक्रीया पुर्ण केली जाईल. लॉडाऊन पुर्वी 700 पदे भरण्याचे आदेश सरकारने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिले होते. मात्र संचालनालयाने दिरंगाई केल्यामुळे १३ एप्रील रोजी पुन्हा स्मरण पत्र पाठवण्यात आले. पदभरती करुन निवड केलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे असे पत्राद्वारे सांगण्यात आले. 

अनेक दिवसांपासून आयटीआय मध्ये कामयस्वरुपी नोकर भरती करण्यात आली नाही. गरज लागेल कशी कंत्राटी तत्वावर नोकर भरती करण्यात आली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आयटीआयचा डोलारा चालत होता, शासनाने याची गंभीर दखल घेऊन कामयस्वरुपी नोकर भरती करण्याचे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला दिले. मात्र, लॉडाऊमुळे सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सुट्टी देण्यात आली, त्यामुळे कोणत्या संस्थेत किती जागा रिक्त आहेत,  विषयानुसार आवश्यक असलेली निर्देशक यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रीया शासकीय स्तरावर सुरु आहे.     

अशी होणार निवड प्रक्रीया

कौशल्य विकास व उद्योग विभागाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया होणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवसी भरती प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रनाखाली पदभरती होईल. निर्देशकांची भरती दोन टप्यात होणार आहे. प्रथम 85 गुणाची   लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराची 15 गुणांची इन कॉमेरा मुलाखत घेतली जाईल.  लेखी परीक्षा आणि मुलाखत चार दिवसात पुर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News