"ह्या" आजारावरील औषध आता कोरोनावर ठरतंय प्रभावी; अमेरिकेतील संशोधकांचा दावा  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 August 2020
  • कोरोना महामारीच संकट संपूर्ण जगासमोर आवासून उभं ठाकलं आहे. कोरोना सारख्या संसर्ग रोगाशी आज सर्व देश लढत आहेत.
  • कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.
  • कोरोना हा आजार बरा होण्यासाठी अजून पर्यंत कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आल नसल्याने गंभीर आजारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरीता केला जात आहे.

कोरोना महामारीच संकट संपूर्ण जगासमोर आवासून उभं ठाकलं आहे. कोरोना सारख्या संसर्ग रोगाशी आज सर्व देश लढत आहेत. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. कोरोना हा आजार बरा होण्यासाठी अजून पर्यंत कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आल नसल्याने गंभीर आजारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरीता केला जात आहे. अश्याच एका आजारावरील औषध सध्या कोरोना वर प्रभावी ठरत असून अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार हे औषध शरीरातील कोरोना विषाणूंची वाढ रोखण्यासाठी उपचारा दरम्यान वापरले जात आहे. 

या औषधाचे नाव "एब्सेलेन" असून ह्या औषधाचा उपयोग हियरिंग डिसऑर्डर म्हणजेच ऐकण्याची क्षमता सुधारण्यासाठी केला जातो. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. हे औषध एक रासायनिक यौगिक म्हणजेच एक केमिकल कंपाऊंड असून एब्सेलेन हे औषध शरीरातील एम्पो एंजाईम्स विरुद्ध लढण्याचं काम करते. ह्यात एंटी व्हायरस, एंटी इंफ्रामेट्री, एंटी ऑक्सिडेटिव्ह, बॅक्ट्रिसिडल आणि सेल प्रोटेक्टिव्ह गुण आहेत.   

शरीरातील एम्पो एंजाईम्स कोरोना वायरसचे जेनेटिक मटेरियल प्रोटिन्स तयार करण्याची क्षमता प्रदान करते. शास्त्रज्ञांनी केल्या दाव्यानुसार शरीरात कोरोना विषाणूची संख्या वाढवत असणाऱ्या एंजाईम्सना नियंत्रणात आणण्याचे काम एब्सेलेन हे औषध करते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार एब्सेलेन हे औषध मानवी शरीरासाठी सुरक्षित आणि उपयुक्त असून क्लिनिकल ट्रायल दरम्यान या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. अमेरिकेतील संशोधकांनी मिळून एंजाइम्स आणि एब्सेलेन औषधाचे विस्तृत मॉडेल तयार केलं असून सुपर कॉम्प्युटरच्या सेम्युलेशनमध्ये एब्सेलेन हे औषध मानवी शरीरातील एंजाईम्स कमी करण्याकरीता फायदेशीर असल्याचे आढळले. अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी लावलेला हा शोध जर्नल साइंस एडवांसेजमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News