मीडीया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मिडिया प्रदर्शन सेंट झेविअर्स महाविद्यालयात....

अमृता शिंदे
Saturday, 18 January 2020
  • सलाम बॉम्बे फाउंडेशन तंबाखू नियंत्रण आणि जीवन कौशल्य विकास या विषयाला घेऊन मागील 18 वर्षांपासून महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमध्ये निरंतर कार्य करीत आहे.

सलाम बॉम्बे फाउंडेशन तंबाखू नियंत्रण आणि जीवन कौशल्य विकास या विषयाला घेऊन मागील 18 वर्षांपासून महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमध्ये निरंतर कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आणि सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी संस्थेमार्फत अनेक उपक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. शाळेत राहून विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात हा उद्देश समोर ठेवता, मिडीया अकादमी हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. या अकादमी मार्फत विद्यार्थ्यांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये फोटोग्राफी, संवादकौशल्य, लेखन, वाचन, संभाषण आणि जीवनकौशल्य विकास, पत्रकारितेचे कौशल्य, आत्मविश्वास, क्रिएटिव्ह रायटिंग, फिल्म मेकिंग याचा समावेश होतो.

सेंट झेविअर्स आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मीडिया प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. (बी.एम. एम.) बॅचलर ऑफ मास मिडिया आणि अकादमी च्या विद्यार्थ्यासोबत "पुस्तका पलिकडीलही " शिक्षण या संकल्पनेवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. या प्रकल्पाचे प्रदर्शन सेंट झेविअर्स महाविद्यालयात दिनांक 22 आणि 23 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची विशेष बाब म्हणजे मिडिया जग, पुस्तकापलीकडील शिक्षण, मिडिया करिअर, शिक्षणावर आधारित मॉडेल्स बघायला मिळतील. सेंट झेविअर्स आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मीडिया प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News