सार्थक भट राज्यात पहिला तर देशात सहावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

नीट’च्या अभ्यासासाठी मी दररोज १२ तास अभ्यास करायचो. भविष्यात मला हृदयशल्यविशारद व्हायचे आहे.
- सार्थक भट

नवी दिल्ली  : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा- २०१९’ (नीट)चा निकाल बुधवारी जाहीर झाला. राजस्थानातील नलीन खंडेलवाल हा देशातून; तर नाशिक येथील सार्थक भट हा राज्यातून पहिला आला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (एनटीए) माध्यमातून देशभर ही परीक्षा घेण्यात आली होती.

खंडेलवाल याने ७२० पैकी ७०१ एवढे गुण मिळवत प्रथक क्रमांक मिळवला; तर सार्थकने ७२० पैकी ६९५ एवढे गुण मिळवत राज्यात प्रथम आणि देशात सहावा येण्याचा बहुमान मिळवला. दिल्लीतील भाविक बन्सल आणि उत्तर प्रदेशातील अक्षत कौशिक यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा 

क्रमांक मिळवला. रॅंकिंगमध्ये मात्र बन्सलला दुसरे स्थान मिळाले असून, त्याने जैवशास्त्र या विषयामध्ये कौशिकपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. मुलींमध्ये तेलंगणमधील माधुरी रेड्डी जी टॉपर ठरली असून, ऑल इंडिया रॅंकमध्ये तिने सातवे स्थान मिळवले आहे.

तिला ७२० पैकी ६९५ गुण मिळाले. दिशा अग्रवाल महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आली. ती देशात ५२ वी आली. दिव्यांगांमध्ये राजस्थानच्या बेहरारामने बाजी मारली असून, त्याने ७२० पैकी ६०४ एवढे गुण मिळवले आहेत.

महाराष्ट्राचा निकाल
सार्थक भट - ६९५ गुण           (देशात सहावा)
सायराज माने - ६८६ गुण         (देशात ३४ वा)
सिद्धांत दाते - ६८५ गुण           (देशात ५० वा)
दिशा अग्रवाल - ६८५               (देशात ५२ वी

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयातून मला एमबीबीएस करायचे आहे. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाबाबत निर्णय घेईन.
- साईराज माने

मी दोन वर्षे ‘नीट’ची तयारी करत होतो. दिवसाला बारा तास अभ्यास करत होतो.
- सिद्धांत दाते

हृदयशल्यविशारद व्हायचे आहे. एमबीबीएस झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासंदर्भात मी दुसरा पर्यायही स्वीकारेन, परंतु सर्जरीशी संबंधित शाखेतच शिक्षण घ्यायचे आहे.
- दिशा अग्रवाल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News