मॅकडोनाल्डकडून मधमाशांसाठी सर्वात चिमुकले रेस्टॉरंट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

मधमाशांची संख्या कमी होत असल्याने ती वाढवण्यासाठी मॅकडोनाल्डनं पुढाकार घेतलाय. फक्त मधमाशांसाठी म्हणून मॅकडोनाल्डनं रेस्टॉरंट सुरु केलंय. ​

मधमाशांची संख्या लक्षणीयरित्या कमी होतेय, त्यामुळंच मॅकडोनाल्डनं मधमाशी संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय. गेली काही वर्षे मधमाश्या संकटात असून त्यांची संख्या कमी होत चाललीय. त्यामुळं अनेक प्रकारची झाडं-झुडपं आणि फुलझाडंही नामशेष होऊ लागली आहे. कारण परागीकरणाचे महत्वाचं कार्य, या मधमाश्या पार पाडत असतात आणि त्यांची संख्या घटत चालल्यानं ही झाडं आणि वनस्पती संकटात आलेत. यावर उपाय म्हणून मधमाशी वाचवा अभियान जगभरात हाती घेतलं गेलंय. 

स्वीडनमध्ये मॅकडोनाल्डनं मधमाश्यांसाठी एक युनिक मिनी आऊलेट सुरु केलंय. मॅकहाइव्ह असं त्याचं नाव ठेवलं असून हे आऊटलेट झाडंझुडपं आणि भरपूर गवत असलेल्या फुलझाडांच्या मैदांनावर आहे. त्याचं डिझाईन करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या गेल्यात. म्हणजे त्यात किती उजेड हवा, सूर्यप्रकाश किती यावा, अंधार किती हवा हे ठरवून त्याप्रमाणे त्याची उभारणी केलीय.

इथं मधमाश्यांना त्यांचे पोळे बांधण्यात काही अडचण नाही. जगातील हे सर्वात चिमुकले रेस्टॉरंट तयार केलंय. त्यावर कंपनीची सोनेरी नाममुद्रा आहे. स्वीडनमधल्या अनेक मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटच्या रुफटॉपवर मधमाश्या पालनाची सोयही केलीय.

मॅकडोनाल्डचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इतरही संस्थांनी असा प्रयोग राबवल्यास मधमाशांचं संवर्धन आणि संरक्षण व्हायला नक्कीच मदत मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News