एमसीएचा अभ्यासक्रम आता झाला दोन वर्षांचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

एमसीए हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे. एआयसीटीईने हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्याचे परिपत्रक काढले आहे. https://www.aicte-india.org/ या संकेतस्थळावर परिपत्रक आहे. पूर्वी हा कोर्स तीन वर्षांचा होता. एमसीए अभ्यासक्रमास नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असलेली मागणी लक्षात घेता, या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा खूप आहे.

औरंगाबाद : तंत्रशिक्षण अंतर्गत एमसीएचा अभ्यासक्रम आता दोन वर्षांचा झाला आहे. याबाबत एआयसीटीईची माहितीपुस्तिका नुकतीच जाहीर झाली आहे. सध्या तीन वर्षांचा अभ्यासक्रम २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून दोन वर्षांचा होणार आहे.

एमसीए हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे. एआयसीटीईने हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्याचे परिपत्रक काढले आहे. https://www.aicte-india.org/ या संकेतस्थळावर परिपत्रक आहे. पूर्वी हा कोर्स तीन वर्षांचा होता. एमसीए अभ्यासक्रमास नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असलेली मागणी लक्षात घेता, या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा खूप आहे.

एमसीए हा दोन वर्षे कालावधीचा पूर्णवेळ प्रोफेशनल अभ्यासक्रम आहे. हा कोर्स इंजिनिअरिंग समकक्ष समजला जातो.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्किंग, ॲडमिनिस्ट्रेशन,ॲन्ड्रॉईड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट, पायथोन तसेच इतर टेक्‍नॉलॉजीचे प्रशिक्षण एमसीए कोर्समध्ये दिले जाते. तसेच शेवटच्या सेमिस्टरमध्ये सहा महिन्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ होतो. पात्र विद्यार्थी याच कंपनीत नोकरीही करतात.

इच्छुक पदवीधरांना एमसीए स्टेट सीईटी सेल https://info.mahacet.org/cet२०२०/MCA२०२०/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. एमसीएच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास शेवटची तारीख २२ फेब्रुवारी असून, २८ मार्चला परीक्षा होणार आहे.

बीसीए, बीएस्सी तसेच बारावीला किंवा पदवीस्तरावर गणित विषय असलेल्या विद्यार्थ्याला एमसीएला प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी एमसीए सीईटीही आवश्‍यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News