योगासनातून मनः शांती मिळावा ... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

डोकेदुखी आणि झोप न येण्याची समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर त्यात हे लाभदायक आहे. मनाची चंचलता दूर करून, क्रोध, चिडचिड, सतत होणारी घाई, चिंता, ताणतणाव दूर ठेवण्यास मदत करते.

सर्वच जण धावपळीचे आयुष्य जगत असतात. कारण बदलत्या काळात बदलत चाललेलं राहणीमान ह्यातून माणूस शांततेचं आयुष्य जगायला विसरत चालला आहे. त्यामुळे माणसाला रोजच्या दैनंदिन जीवनात मनः शांती मिळत नाही .. रोजच्या या गडबडीमध्ये मन:स्वास्थ मात्र हरवत चाललं आहे अशी तक्रार सगळे जण करताना दिसतात. णूनच आज जाणून घेऊ मन:शांती कशी मिळवू शकाल ते. त्यासाठी करता येईल ती ज्ञान मुद्रा.

 ध्यान करता येईल अशा कोणत्याही आसनात बसा. कंबर आणि मान सरळ ठेवा. हाताचे तळवे दोन्ही गुडघ्यावर ठेवा. आता दोन्ही हातांच्या तर्जनी वाकवून त्या अंगठ्याला जोडा. इथे इतर तीन बोटं सरळ करून एकमेकांना जोडा. आता डोळे बंद करून ध्यानअवस्थेत बसून राहा. ही मुद्रा मेंदूच्या स्नायूंना बळ देते. त्यामुळे स्मरणशक्ती, धैर्य, एकाग्रता, मानसिक बळ वाढवणारी ही मुद्रा आहे. हे करत राहिल्यानं बुद्धीचा विकास होतो. डोकेदुखी आणि झोप न येण्याची समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर त्यात हे लाभदायक आहे. मनाची चंचलता दूर करून, क्रोध, चिडचिड, सतत होणारी घाई, चिंता, ताणतणाव दूर ठेवण्यास मदत करते. ध्यान, प्राणायाम केली जाणारी ही मुद्रा आहे. ध्यान लवकर लावता येण्यासाठी ही मुद्रा सहाय्यकारक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News