पुण्यातील लोकांसाठी चिंतेची बाब! या वयाच्या लोकांनी सावधान...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020
  • कोरोनाचा पुण्यात प्रादुर्भाव वाढत आहे.
  • पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
  • पुण्यात सध्या एकूण २८ हजार १४२ कोरोना रूग्ण आहेत.
  • तर ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे :- कोरोनाचा पुण्यात प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुण्यात सध्या एकूण २८ हजार १४२ कोरोना रूग्ण आहेत. तर ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु अलिकडेच एका सर्वेक्षणातून समजले की, पुण्यातील ६० आणि त्या पेक्षा जास्त वय असलेल्या ९२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने करण्यात आला होता.  

या सर्वेक्षणा अंतर्गत पुण्यातील एकूण २.४६ लाख पुण्यातील तर ३५०० पिंपरी चिंचवडमधील लोकांची तपासणी करण्याती आली. त्यात ९२२ नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, ज्यांचे वय ६० आणि त्या पेक्षा जास्त होते. या सर्वेक्षणामुळे शहरातील अति धोकादायक, कमी धोकादायक अशा रुग्णांची विभागणी करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले.

पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, "आम्ही एक अॅप तयार केले आहे. ज्याचे नाव आहे वयश्री. यात अॅपमध्ये वयस्कर व्यक्तींची माहिती साठवली जात आहे. यापूर्वी प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करावे लागत होते. परंतु आता या अॅपच्या माध्यमातून सहज माहिती उपलब्ध होत आहे. सर्वेक्षणा नंतर जास्त कोरोना रुग्ण असलेल्या परिसरांत नोडल ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले आहे", असे सांगितले. तर, पिंपरी चिंचवड मधील ही २ लाख वयस्कर व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

पण, या सर्व्हेतून ६० आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडा आणि बाहेर पडल्यास मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने लोकांना करण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. सलग गेले काही दिवस राज्यात दररोज १४ हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारीही १४ हजार ७१८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही ७ लाख ३३ हजार ५०० एवढी झाली आहे. तर ३५५ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी ९१३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात १ लाख ७८ हजार जण करोनावर उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७२.३६ टक्के एवढे झाले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News