मातृत्वाचा पाझर

शारदा देशमुख, सातारा
Friday, 10 May 2019

शोधून वेडीवाकडी वळने पार करतेस आणि दिव्यज्योतीच्या मशालीत पुन्हा एकदा सामावतेस .नेहमीच दिसतेस मला तू , कवीच्या अंतरंगातुन धावत धावत बाहेर पडतेस , आणि त्यालाच वेगळं करतेस 

भावनांच्या अनंत यातना सहन करून तू जेव्हा प्रसव होतेस आणि मग टाहो फोडतेस विचारांचे, एका अभ्रकासारखे तू कधी विस्कटतेस बेफिकीरपणे, धावणाऱ्या वाऱ्यासारखी मोकाट अन, 

व्यापून घेतेस साऱ्या आसमंताचे साखळदंड तोडून, प्रश्नाच्या तिमिराला गिळंकृत करतेस, एखाद्या अजगरासारखे बेभान निझ्ररा पसरव्यात दगडावर कपाळमोक्ष  होणाऱ्या नदीसारखे,

कधी तू ओक्साबोक्षी रडतेस आणि थकून भागून धरणीवर अंग टाकून देतेस अन एकटीच पाहत राहतेस शून्यात तर कधी बंड करून उठतेस अन आपलाच अस्तित्व 

शोधून वेडीवाकडी वळने पार करतेस आणि दिव्यज्योतीच्या मशालीत पुन्हा एकदा सामावतेस .नेहमीच दिसतेस मला तू , कवीच्या अंतरंगातुन धावत धावत बाहेर पडतेस , आणि त्यालाच वेगळं करतेस 

त्याच्या नावातुन ...
मातृत्वाचा पाझर फुटनाऱ्या आईसारख लडीवाळ... झुलनाऱ्या झुल्यात काही विरामचिन्हे तू सोडून जातेस .तसंही तुझं असणं मला सुखाऊन जात कारण मी माणूस असल्याची जाणीव करून देतं.

तू कशीही ये विद्रुप, अबोल, अपंग,
आकारहीन कशीही ये पण माझ्या लेखणीतुन तू पुन्हा  एकदा प्रसवून ये... मी वाट पाहीन...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News