रेमडेसी इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

कोविड रुग्णांसाठी प्रभावी ठरणारे रेमडेसिवर या इंजेक्‍शनचा बाजारात मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे. अवाच्या सव्वा किमतीने या इंजेक्‍शनची विक्री होत आहे.

मुंबई: कोविड रुग्णांसाठी प्रभावी ठरणारे रेमडेसिवर या इंजेक्‍शनचा बाजारात मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे. अवाच्या सव्वा किमतीने या इंजेक्‍शनची विक्री होत आहे. मुळ किमतीच्या 10 पट अधिक दराने या इंजेक्‍शनची खरेदी रुग्णांना करावी लागत आहे.

सध्या काळ्या बाजारात रेमडेसिवर 30 ते 40 हजार रुपये किमतीने विकले जात आहे. हा तुटवडा कमी व्हावा आणि लोकांना हे इंजेक्‍शन उपलब्ध व्हावे म्हणून राज्य सरकारने सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसिवर औषध मागवले आहे. दरम्यान, पालिकेने 15 हजार इंजेक्‍शनची मागणी केली असून 5 हजार 900 इंजेक्‍शन त्यांना देण्यात आली आहेत. रेमडेसिवर हे इंजेक्‍शन बांगलादेशातील एका कंपनीकडून भारतात मागवण्यात येत आहे. मुंबईतून बांगलादेश आणि भारतातील काही कंपन्यांना दिवसाला 50 प्रिस्क्रिपशन दिले जात आहेत.

दरम्यान, ड्रग नियंत्रण जनरल ऑफ इंडियानुसार (डीसीजीआय), औषध कंपन्या फक्त रुग्णालयांना रेमडेसिवरची विक्री करू शकतात. मात्र, औषध विक्रेते काळ्याबाजारात हे इंजेक्‍शन जास्तीच्या दराने जवळपास 30 ते 40 हजार रुपये किमतीने विकत आहेत. दरम्यान, सिप्ला कंपनीने बुधवारी सिप्रेमी नावाची रेमडेसिवरची पहिली बॅच दिली आहे. एका महिन्यात 80 हजार इंजेक्‍शनचा पुरवठा सिप्लाकडून करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

5 हजार रुपयांचे रेमडेसिवर इंजेक्‍शन 50 हजार रुपयांना विकले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी बांगलादेशने जसे उत्पादन सुरू केले होते तसेच जर आपण सुरू केले असते तर ही वेळ आली नसती. ज्यांनी औषधाचा काळा बाजार केला त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे.
- कैलाश तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशन.

मी अडीच दिवसांपासून शोधत होतो. बऱ्याच मेडिकलमध्ये संपर्क केला होता. त्या प्रत्येकाने रेमडेसिवर उपलब्ध नाही असे सांगितले. त्यानंतर, 30 ते 40 हजार किमतीने हे इंजेक्‍शन उपलब्ध झाले होते. मात्र, काल दुपारी 5,400 रुपयांना हे इंजेक्‍शन मिळाले.
- प्रज्ञा पिसाळ, रुग्णांच्या नातेवाईक.

जर कोणीही जास्त पैसे घेत असेल तर याबाबत माहिती द्यावी. या इंजेक्‍शनची फक्त एक तुकडी आत्तापर्यंत पोहचली आहे. ती पुरवठा प्रक्रियेत आहेत. पाच दिवसांच्या आत ही परिस्थिती सामान्य होईल. आधी फक्त हेटेरो या कंपनीने साठा पुरवला होता. मात्र, काल सिप्लाने ही पुरवठा केला आहे. आता 5 हजार 400 रुपयांना हे इंजेक्‍शन उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत किती जणांना याचा पुरवठा झाला याची माहिती ही एफडीएला दिली आहे.
-शरद नांदेकर, औषध निरीक्षक, एफडीए.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News