मास्कमुळे मेकपची गरज नाही: पेत्रा क्विटोवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 27 May 2020

कोरोनामुळे फ्रेच ओपन स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तर विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली. डब्ल्यूटीए स्पर्धा जुलैपर्यंत सुरू होणार नाही. प्राग येथे सुरू होत असलेल्या स्पर्धेत आठ पुरुष व आठ महिलांचा समावेश असून यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्राग : कोरोना महामारीचे संकट कायम असले तरी काही देशांत प्रेक्षकांविना क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे; मात्र हा विचार किंवा पर्याय जगातील दिग्गज टेनिसपटूंना रुचलेला नाही. रॉजर फेडररने याविषयी नाराजी व्यक्त केली असताना दोन वेळा विम्बल्डन विजेतेपद मिळविणारी पेत्रा क्विटोवा हिने फेडररची री ओढली आहे. प्रेक्षकांविना खेळण्यापेक्षा मी ग्रॅंड स्लॅममधून माघार घेणे पसंत करेन, असे वक्तव्य क्विटोवाने केले आहे.

झेकमधील स्पर्धेने ती कोर्टवर दाखल होत आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला 30 वर्षीय क्विटोवा बोलत होती. रिकाम्या रोलॅं गॅरोस आणि फ्लशिंग मिडोज स्टेडियमवर खेळण्यास आपला विरोध आहे, असे गेल्या आठवड्यात रॉजर फेडरर म्हणाला होता. या विचाराला क्विटोवाने पाठिंबा दिला. ती म्हणाली, ग्रॅंड स्लॅम खेळण्याचे माझे अजून वय आहे; परंतु हे असे असेल, तर मी खेळणे रद्द करील. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळणे ही फार गौरवाची बाब आहे; मात्र आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांविना ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळणे, हे योग्य नाही आणि ते ग्रॅंड स्लॅम स्पर्धेलाही साजेसे नाही, असेही ती म्हणाली.

कोरोनामुळे फ्रेच ओपन स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तर विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली. डब्ल्यूटीए स्पर्धा जुलैपर्यंत सुरू होणार नाही. प्राग येथे सुरू होत असलेल्या स्पर्धेत आठ पुरुष व आठ महिलांचा समावेश असून यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे हस्तांदोलन होणार नाही. या स्पर्धेत क्विटोवा भाग घेत आहे. यात बॉल बाईज राहतील, रेफरी राहतील, मात्र, हात पुसण्यासाठी टॉवेल देण्यात येणार नाही. मार्च महिन्यापासून प्रागमध्ये नऊ हजार कोरोगाग्रस्तांपैकी 300 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्पर्धेविषयी क्विटोवा म्हणाली, आम्ही येथे केवळ झेक प्रजासत्ताकला टेनिसची पुन्हा ओळख करून देण्यासाठी आलो नसून जगाला ओळख करून देण्यासाठी आलो आहोत. बऱ्याच काळापासून सामना खेळले नसल्याने लय गाठणे हे सर्वांत जिकिरीचे काम आहे, असे ती म्हणाली. तिची सलामीची लढत दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू बार्बोरा क्रेजसिकोव्हा हिच्याविरुद्ध होईल.

मास्कमुळे मेकपची गरज नाही
सध्या जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेली क्विटोवा खेळताना मास्क घालणार आहे. ही चांगली गोष्ट असून यामुळे मला मेकअप करावा लागणार नाही, असेही ती गंमतीने म्हणाली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News