लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या मनात काय असतं? हे जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 21 August 2019

लग्न झालेल्या त्या रात्रीबद्दल मुलांना हे कळतच नाही की त्यांना नेमकं करायचं तरी काय आहे आणि नवीन घरात, नवीन वातावरणात मुलीला आणि स्वत:ला काय हवं हे सांगत देखील नाही.

लहानपणापासून दुसर्‍याच्या घरी जायचे आहे हे आपल्या आईवडिलांकडून ऐकत मुली स्वप्न रंगवत असतात. लग्न म्हटलं तर मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात कारण तिला आपलं घर सोडून दुसर्‍या कोणाच्या घरी त्याच्या कुटुंबासोबत जुळवून घ्यायचं असतं. तसेच लग्न झाल्यावर पुढे नेमकं काय असते ही चर्चा मुलामुलींमध्ये सुद्धा होत असते. पण खरंच तुम्हाला माहिती आहे का? लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या मनात असतं,  हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे 

लग्न झालेल्या त्या रात्रीबद्दल मुलांना हे कळतच नाही की त्यांना नेमकं करायचं तरी काय आहे आणि नवीन घरात, नवीन वातावरणात मुलीला आणि स्वत:ला काय हवं हे सांगत देखील नाही.

मुलींची इच्छा असते की सर्वात आधी तर मुलाने प्रेमाने तिच्याशी गप्पा मारव्या. तिचा हात आपल्या हातात घेऊन भावना शेअर कराव्या. एकमेकांना एकमेकांबद्दल काय आवडतं हे सांगावं. आवड-निवड सांगाव्या. आणि शेवटी ही जाणीव करून द्यावी की प्रत्येक पावलावर तो तिच्या साथ देईल.

अनेक मुली लग्नाच्या धावपळीत व्यवस्थित आहार घेऊ पात नाही. अशात तिच्यासाठी काही लाइट फूड किंवा ज्यूस, शेक, ड्राय फ्रूट्स अरेंज केल्यास तिला निश्चित आनंद होईल आणि नवरा पुढे देखील तिची काळजी घेईल हे कळून येईल.

मुलींना गिफ्ट्स, फुलं यांची खूप आवड असते. म्हणून पहिल्या रात्री तिला गिफ्ट मिळालं तर ती फार खूश होईल आणि नेहमी ते गिफ्ट आवरून ठेवेल.

मुलींना फर्स्ट नाइट नेहमी लक्षात राहावी असं वाटतं असतं. याला मेमोरेबल करण्यासाठी फोटोहून अधिक स्पेशल काय असू शकतं. सेल्फी, कँडिड फोटो उत्तम पर्याय ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News