मराठवाडी सकस दुध्याचे धपाटे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • तुम्ही नेहमीच धपाटे खातात पण आज मी तुमच्यासाठी घास दुध्याच्या धपाट्याची रेसिपी घेऊन आली आहे.

तुम्ही नेहमीच धपाटे खातात पण आज मी तुमच्यासाठी घास दुध्याच्या धपाट्याची रेसिपी घेऊन आली आहे.

 

साहित्य :-

  • ज्वारीचे पीठ ४ मोठे चमचे
  • मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून (दुध्या कोवळा असावा)
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • लाल तिखट पूड किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • मीठ चवीनुसार
  • जिरे आवडीनुसार
  • ओवा चिमूटभर
  • तीळ चिमूटभर
  • धण्याची पूड चिमूटभर
  • हळद चिमूटभर
  • तेल थोडेसे
  • चिमूटभर गरम मसाला
  • पाणी

कृती :

भाकरी थापता येत असेल तर हे धपाटे पण जमतील. साधारण कृती भाकरीसारखीच आहे. दुध्याचा कीस थोडेसे तेल टाकून परतून घ्यावा. हे करणे गरजेचे आहे. कारण कोवळ्या भाजीला पाणी सुटते आणि धपाटे थापणे अवघड होऊन बसते. वाफ आल्यानंतर ज्वारीच्या पिठात तो कीस आणि इतर जिन्नस टाकून व्यवस्थित एकत्र करा. आता हे पीठ छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकत भाकरीसाठी भिजवतो त्याप्रमाणे भिजवा. भाकरी थापतो तसे थापायचे आहे. त्यानुसार consistency असू द्या. ह्या स्टेपला तेल शक्यतो वापरू नये, कोमट पाणी वापरा.

गोळा झाल्यानंतर त्याची कोरड्या ज्वारीच्या पीठावर घोळवून भाकरी थापतो तसे थापून घ्या. जाड बुडाच्या तव्यावर (लोखंडी असल्यास उत्तम, नॉनस्टिक पण चालेल) थापलेला धपाटा टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्या. धपाटा उलटसुलट करण्यासाठी सराटा/ उलथनं हाताशी हवे. धपाटा भाजत असताना कडेने तेल सोडा.

अधिक टिपा :-

  • हे धपाटे ताजे घट्ट गोड दह्याबरोबर खा किंवा किंचित आंबट लोणचंही चालेल.
  • काहीही न घेता नुसतेही गट्टम करू शकता. ते आधीच खमंग असतात.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News