आॅनलाईन परीक्षेत अडचण? मराठवाडा विद्यापीठाला कारण कळविण्याची उद्यापर्यंतच आहे मुदत

यिनबझ
Friday, 16 October 2020

ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही माहिती विद्यापीठाला कळविली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही माहिती coeexamfeedback@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावी,

औरंगाबादः डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा देणाऱ्या काही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ९ व १० आॅक्टोबर रोजी काही तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाईन परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपला अभिप्राय व कोणत्या कारणांनी परीक्षा देता आली नाही याची माहिती विद्यापीठाला कळविण्याची अंतिम मुदत उद्या (१७ आॅक्टोबर रोजी) संपत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही माहिती विद्यापीठाला कळविली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही माहिती coeexamfeedback@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News