मराठवाड्या पद्धतीची थालीपिठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
 • थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो.
 • थालीपिठ ही एक  महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
 • तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची थालीपिठांची रेसिपी घेऊन आली आहे.   

थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो. थालीपिठ ही एक  महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची थालीपिठांची रेसिपी घेऊन आली आहे.   

 

साहित्य :-

 

 • ३ वाट्या ज्वारीचं पीठ
 • १ वाटी बेसन /चणाडाळीचं पीठ
 • चवीनुसार लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • मीठ
 • चिमूटभर जिरे
 • चिमूटभर ओवा
 • चिमूटभर तीळ
 • चिमूटभर हळद
 • धणेपूड
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • २ कांदे बारीक चिरलेले
 • आवडत असेल तर १ बारीक चिरलेला टोमॅटो
 • तेल

 

कृती :-

एका परातीत किंवा टोपात तेल वगळून वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात पाणी टाकून पीठ मळून घ्यावे. साधारण थालीपीठाला भिजवतो तसे छान मऊ थापले जाईल असे पीठ मळावे. पीठ गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे.

नॉन स्टिक पसरट भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे. गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत. बरेच जण प्लास्टिक कागदावर थापून मग तव्यावर/ पसरत भांड्यात शेकतात/भाजतात आपण डायरेक्ट तव्यावरच थापले चालतील. थापताना ज्वारीची पीठ हाताला चिकटते, म्हणून हाताला तेल लावून घ्यावे. थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे. तेलामुळे चव चांगली येते म्हणून तेल टाकायचे आहे, कमी तेल टाकले तरी चालू शकते.

दोन्ही बाजूनी खरपूस,  खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे. कडक झाल्यानंतर खायला आणखी मजा येते. भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे. अश्याप्रकारे आपली मराठवाड्या पद्धतीची थालीपीठ तयार होतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News