परीक्षेत वेळ कमी पडतो ? असं करा वेळेचं नियोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 January 2020
  • परीक्षा जवळ आली की, विद्यार्थी मानसिक तणावाखाली जातात. परीक्षेची  पूर्वतयारी कशी करावी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना तो वेळेत कसा पूर्ण करता येईल? हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा राहतो.

मुंबई: परीक्षा जवळ आली की, विद्यार्थी मानसिक तणावाखाली जातात. परीक्षेची  पूर्वतयारी कशी करावी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवताना तो वेळेत कसा पूर्ण करता येईल? हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा राहतो. संपूर्ण अभ्यास करूनही आणि पेपर सोपा असूनही वेळेअभावी पेपर अर्धवट राहून जातो. परिणामी विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या मार्कांवर होतो.याचं नेमकं कारण म्हणजे वेळेच्या नियोजनामध्ये अभाव. दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खुरूप महत्वाचं असून यावेळी अभ्यासाचा तणाव अधिक असतो. त्यामुळे अभ्यासाचं आणि परीक्षेचं नियोजन खुप महत्वाचं आहे. तर आज आम्ही तुम्हाला परीक्षेसाठी वेळेचं नियोजन कसं करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. 

सुरुवातीला प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्या: 

परीक्षेला बसताना पेपर हातात आल्यावर तो आधी व्यवस्थित वाचून घ्या.   त्यामध्ये काही चुका आहेत का, प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत हे पहा. तसेच कोणत्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला येतात ते प्रश्न आधी सोडवा त्याचप्रमाणे राहीलेले कठीण प्रश्न नंतर सोडवा जेणेकरून तुम्हाला जे अचूक येतंय त्याचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात.   

सुटसुटीत आणि अचूक लिखाण: 

परीक्षेच्या वेळेत मुळात वेळेत पेपर पूर्ण करण्याची सर्वांची धडपड असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी घाईघाईमध्ये लिखाण करत असतात. परिणामी अनेक चुका आणि खाडाखोड होत असते. म्हणून असे न करता सुटसुटीत आणि आकर्षक लिखाण करावे. तसेच एक प्रश्न किती वेळेत सोडवला गेला पाहिजे याची पूर्व तयारी विद्यार्थ्यांनी आधी करावी. म्हणजेच २-३ तासाच्या वेळेत प्रत्येकी प्रश्नाला १०-१५ मि. असे वेळेचे नियोजन करावे  त्यासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. असे केल्यास तुम्हाला वेळेअभावी मार्क जमविण्याची भीती राहणार नाही. आणि तुम्हाला अधिकाधिक चांगले गुण मिळतील.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News