विनाचालक बस थांबवुन तरुणाने वाचवले अनेकांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

रसत्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक देऊन बस पुढे निघाली. कात्रजच्या मुख्य चौकापर्यत बस आली. पुढे मोठा आनर्थ होणार हे पाहणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी आरडा ओरड केली.

पुणे : स्वत:चा जीव धोक्यात घालून एका तरुणाने लाखो लोकांचे प्राण वाचवल्याची थरारक घटना पुणे येथील कात्रस परिसरात आज सकाळी आठच्या दरम्यान घडली. तरुणाने दाखवलेल्या धाडसाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहेत.   

सकाळी कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, चाकरणामी यांची लगबग सुरु होतो. तेवढ्याच कात्रज   पीएमपीएल डेपोमधून MH 15, CW 1744 क्रमांकाची बस बाहेर आली. कात्रज ते स्वारगेट व्हाया हौसींग बोर्ड जाण्यासाठी तयार होती. वाहन चालक पिराजी दिवटे उतरावर बस उभी करुन वाहकास बोलावण्यासाठी निघून घेला. अचानकपणे विनाचालक बस हळूहळू पुढे जाऊ लागली. 

रसत्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक देऊन बस पुढे निघाली. कात्रजच्या मुख्य चौकापर्यत बस आली. पुढे मोठा आनर्थ होणार हे पाहणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी आरडा ओरड केली. ऐवढ्यातच एका तरुण टॉक्सी ड्रायव्हरचे लक्ष बसकडे गेले. दिगंबर कोराळे या तरुणाने आपला जीव धोक्यात घालून मागच्या दरवाज्यातून बसमध्ये प्रवेश केला आणि वाहन चालकाच्या सीटवर जावुन बसला. ताबडतोब ब्रेक दावुन बसवर नियंत्रन मिळविले. सर्वांत महत्त्वाच म्हणजे बसमध्ये कोणीही प्रवाशी नव्हते. हा संपुर्ण थरार पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत आला होता.

ही बस ट्रँव्हल टाईम कंपणी आहे, पीएमपीएलने भाडेत्त्वार चालवण्यासाठी घेतली होती. बसने MH 12 E 7837 आणि MH 12 QE 7940 या दोन रिक्षाला धडक दिली यात रिक्षा चालक जावेद बेडगे आणि बाळासाहेब महारनवर हे गंभीर जखली झाले तसेच शिक्षाचे आर्थिक नुकसान झाले. अशा अनेक भंगार बसेस पीएमपीएलने भाडेत्त्वार घेतल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांचा जीव टांगतील लगाला आहे. अशा भंगार बसवर आणि वाहन चालकांवर पीएमपीएल काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News