सोशल मीडियावर गाजतंय पुणेरी पोलिसांचं 'हे' ट्विट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 January 2020
  • 'पुणे तिथे काय उणे' हे वाक्य पुणे शहरासाठी शोभून दिसणारं आहे. पुणेरी 'बिग बाली', पुणेरी पोशाख, याचप्रमाणे पुणेरी पाट्याही तितक्याच फेमस आहेत. पुणेरी स्टाईलसोबतच पुण्याची भाषा जगभरात प्रसिद्ध आहे, त्याची चर्चाही सगळीकडे होताना दिसतेच.

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' हे वाक्य पुणे शहरासाठी शोभून दिसणारं आहे. पुणेरी 'बिग बाली', पुणेरी पोशाख, याचप्रमाणे पुणेरी पाट्याही तितक्याच फेमस आहेत. पुणेरी स्टाईलसोबतच पुण्याची भाषा जगभरात प्रसिद्ध आहे, त्याची चर्चाही सगळीकडे होताना दिसतेच. अशातच पुणेरी पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमध्ये पुण्याच्या पोलिसांनी एका बाईकस्वाराच्या फॅन्सी नंबरविषयी मजेशीर ट्विट केले आहे. 'खान साहेब' असं त्या नंबरप्लेटवर लिहिलेलं नाव असून पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

एका मुलाने पोलिसांना हेल्मेट न घातलेल्या मुलाचा फोटो शेअर केला होता त्यावर पुणेरी पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया ही लक्ष वेधून घेणारी होती. पोस्ट केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया देत पोलीस म्हणाले की,'खान साहेब तुम्हाला कूलही राहायचे आहे, तसेच हेअर स्टाईलपण दाखवायची आहे, हिरोसारखी बाईकही चालवायची आहे, पण तेही वाहतुकीचे नियम न पाळता, मग असं कसं चालेल?’ या ट्विटला  सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल केले जात असून यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.याच अनेक प्रतिक्रियांमध्ये एका नेटकऱ्याने "मला खुप हसू येत असून खानसाहबला किती दंड भरावा लागणार? असं ट्विट केलं त्याचबरोबर खानसाहबच्या या फोटोमुळे त्यांची शान कमी झाली असल्याची खोचक टीकाही केली जात आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News