मिथिलाने उलगडला तिच्या नात्यातील गोड प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

मुंबई : मिथिला पालकर हे नाव आज तरुणाईच्या मनावर राज्य करत आहे. मिथिलाची सुरुवात ही सोशल मीडियावर एका व्हिडिओतुन झाली. या व्हिडिओमध्ये मिथिलानं 'ही चाल तुरु तुरु' या गाण्याचं 'कपसॉंग' सादर केलं होत.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आणि त्यातूनच  तिला ओळख मिळू लागली. पण आज तिने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने कलाविश्वात वेगळं स्थान मिळवलं आहे.  'मुरांबा', 'लिटील थिंग्स', 'कारवाँ' यांसारख्या चित्रपटांबरोबरच अनेक वेब सिरीजमध्ये मिथिलानं आपल्या अभिनयाचा  वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच अनेक कव्हर मॅगझिनमध्ये ती मॉडेल्स म्हणून झळकली.

मुंबई : मिथिला पालकर हे नाव आज तरुणाईच्या मनावर राज्य करत आहे. मिथिलाची सुरुवात ही सोशल मीडियावर एका व्हिडिओतुन झाली. या व्हिडिओमध्ये मिथिलानं 'ही चाल तुरु तुरु' या गाण्याचं 'कपसॉंग' सादर केलं होत.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आणि त्यातूनच  तिला ओळख मिळू लागली. पण आज तिने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने कलाविश्वात वेगळं स्थान मिळवलं आहे.  'मुरांबा', 'लिटील थिंग्स', 'कारवाँ' यांसारख्या चित्रपटांबरोबरच अनेक वेब सिरीजमध्ये मिथिलानं आपल्या अभिनयाचा  वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच अनेक कव्हर मॅगझिनमध्ये ती मॉडेल्स म्हणून झळकली. सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या याच मिथिलाच्या मनावर नक्की कोण राज्य करतंय? हा प्रश्न सर्वाना किंबहुना तरुणांना पडला आहेच.

नुकताच मुंबईमध्ये स्पोकन फेस्टिवल साजरा करण्यात आला यामध्ये मिथिलानं तिच्या जवळची व्यक्ती कोण आहे? याबाबत खुलासा केला आहे.यावेळी तिने आपल्या लहानपणीच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत. दादर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपल्या आजी-आजोबांसोबत घालवलेले क्षण तसेच त्यांच्याशी असेलेला आपल्या नात्याचा गोडवा शब्दांमध्ये  मांडला आहे. आपल्या अभिनयाला विरोध करणारे आपले आजोबा आज आपलं कौतुक करत आहेत. याचा आनंद मिथिलाने बोलताना व्यक्त केला. त्याचप्रमाणे आजीने आपल्याला "चांगल्या घरातल्या मुली आपलं शिक्षण संपवतात,नोकरी करतात आणि संसाराला लागतात. असं सांगितलं होतं.  हे सर्व सांगत असताना मिथिलाचं आपल्या आजी-आजोबांबद्दलच निखळ प्रेम व्यक्त होताना दिसत होतं. आजोबांना 'थँक्यु भाऊ' असं म्हणून मिथिलानं त्यांचे आभार मानले. यावरून त्यांच्यात असणारा भावनिक बंध प्रकट झाला. आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या आजोबाना, "मी लवकरच घरी येणार आहे,दार उघडं ठेवा फक्त थोडा उशीर होईल". असा भावनिक संदेश मिथिलानं आपल्या आजोबांना दिला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News