मराठी रंगभूमीवर अवतरणार २० फूट डायनासॉर 

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 2 February 2019

     ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटातील अवाढव्य डायनासॉर सगळ्यांनीच पाहिला. पण आता वीस फुटी डायनासॉर रंगभूमीवर अवतरणार आहे. मोहन चोरघे-पाटील निर्मित ‘जंगल बुक द ट्रेझर’ या नाटकात वीस फुटी डायनासॉर आणि सात फुटी गोरिला दिसणार आहेत.

     या नाटकात ‘इवा’ असे या अवाढव्य डायनासॉरचे; तर ‘बुबो’ असे गोरिलाचे नाव असणार आहे. हे एक रोबोटीक ॲनिमेट्रॉनीक नाटक आहे. मराठी रंगभूमीवर हा प्रयोग प्रथमच होतोय. व्यवसायाने आर्किटेक्‍ट असलेल्या प्रीती दळवी-चोरघे यांनी हे नाटक लिहिले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे.

     लक्ष्मी-नारायण प्रॉडक्‍शन निर्मित यात के. राघवकुमार, कृणाल जाधव, नमिता सावंत, जीवन सावंत, विनायक घगवे आदी कलाकार यामध्ये काम करताना दिसतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News