खर्डी जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयत 'मराठी राजभाषा दिन ' उत्साहात साजरा

दिव्येश जाधव
Friday, 28 February 2020

सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी,भाषेचा समृद्ध वारसा,भाषिक कौशल्य,मराठी भाषेची स्थित्यंतरे, मराठीच्या सारस्वतांचा परिचय व त्यांचे उत्तुंग कार्य, भाषेसमोरील आव्हाने, भाषा संवर्धनासाठी आपली भूमिका/जबाबदारी, मराठी साहित्याचा जागर व प्रसार इ.ची माहिती दिली.

खर्डी : जीवनदीप कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खर्डी येथे २७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषा दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज अर्थातच वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कुसुमाग्रज्यांच्या विविध प्रकारच्या कवितांचे विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण वाचन केले तसेच आपल्या मनोगतामधून त्यांनी भाषेविषयी असलेल्या आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. मराठी अभिमान गीत गाऊन या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची आणखी शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभागातील प्रा.दीप्ती बांगर यांनी केले.
 

या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रा.विशे सर, प्रा.घोरपडे सर, प्रा.धसाडे सर, प्रा.पाटील मॅडम, प्रा.सासे मॅडम व प्रा.देशमुख सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. या सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी,भाषेचा समृद्ध वारसा,भाषिक कौशल्य,मराठी भाषेची स्थित्यंतरे, मराठीच्या सारस्वतांचा परिचय व त्यांचे उत्तुंग कार्य, भाषेसमोरील आव्हाने, भाषा संवर्धनासाठी आपली भूमिका/जबाबदारी, मराठी साहित्याचा जागर व प्रसार इ.ची माहिती दिली. कार्यक्रमात इ.११ वी च्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच कार्यक्रम पार पडल्यानंतर ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली व विविध संदर्भग्रंथ, भाषिक कौशल्य विकास पुस्तके,मासिके इ.ची माहिती विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील मा.कोळी सर व मा.भगत मॅडम यांच्याद्वारे मिळाली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News