विराट ठरला 'ही' कार खरेदी करणारा पहिला भारतीय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या खेळामुळे किंवा पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु विराट आता वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या खेळामुळे किंवा पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु विराट आता वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. नामांकित कारची कंपनी ऑडीने नुकतीच एक नवीन आलिशान कार लाँच केली आहे. त्या कारचे नाव SUV ऑडी क्यू 8 असे असून कारच्या लॉन्च होणाच्या फक्त २४ तासाच्या आत विराटने ही कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. भारतात या कारची किंमत 1.33 कोटी इतकी असून विराट  ही  कार खरेदी करणारा पहिला भारतीय असल्याचं म्हटलं आहे. 

कस्टमायझेशनसोबतच 57 एक्सटीरिअर कलर ऑप्शन, 11 इंटिरियर ट्रिम्स आणि 9 वूडन पर्याय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे HD matrix LED सह 3D LED DRLsहे फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.तसेच सिंगल फ्रेम octagonal ग्रिलसुद्धा आहे.या कारमध्ये पेट्रोलचा पर्यायदेखील उपलब्ध असून SUV Q7 या कारपेक्षा SUV ऑडी क्यू 8 जास्त फीचर्स असणारी आणि आकर्षक आहे. या कारची चाके SUV Q7 पेक्षा मोठी असून त्यामध्ये 20 ते 21 इंच अलॉय व्हिलचा समावेश आहे. 

ऑडी क्यू 8 कारचे आतील डिझाईन खूपच आकर्षित आहे. त्याचप्रमाणे इन्फोटेनमेंट सिस्टिमसाठी 10.1 इंच इतकी टचस्क्रीन देण्यात आली आहे.  गाडीमध्ये हीटिंग आणि एसीच्या माहितीसाठी 8.6 इंचाचा डिस्प्लेसुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहे.  इतर कारच्या तुलनेत ही कर अधिक वेगवान असून ०ते१००किमीचे अंतर फक्त ६ सेकंदात गाठते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News