सैफ-अमृताच्या घटस्फोटाबद्दल साराने केलं असं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • बॉलीवूड कलाकारांच्या पर्सनल लाईफच्या चर्चा नेहमीच होत असतात. लग्नानंतर घटस्फोट घेऊन लगेचच दुसरं लग्न करणं या गोष्टी बॉलीवूड कलाकारांसाठी काही नवीन नाहीत. अनेक असे कलाकार आहेत की ज्यांनी त्यांना मुलं असूनसुद्धा घटस्फोट घेऊन स्वतःचा वेगळा संसार थाटला आहे. सैफ-अली खान आणि अमृता सिंग यांच्यात झालेला घटस्फोट हा याच प्रकारणांमधील एक आहे. 

मुंबई : बॉलीवूड कलाकारांच्या पर्सनल लाईफच्या चर्चा नेहमीच होत असतात. लग्नानंतर घटस्फोट घेऊन लगेचच दुसरं लग्न करणं या गोष्टी बॉलीवूड कलाकारांसाठी काही नवीन नाहीत. अनेक असे कलाकार आहेत की ज्यांनी त्यांना मुलं असूनसुद्धा घटस्फोट घेऊन स्वतःचा वेगळा संसार थाटला आहे. सैफ-अली खान आणि अमृता सिंग यांच्यात झालेला घटस्फोट हा याच प्रकारणांमधील एक आहे. 

सैफ आणि अमृताची मुलगी म्हणजेच सारा अली खान ही  सध्या तिच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा आणि कार्तिक आर्यन यांची मुख्य भूमिका असणारा लव्ह आज कल २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे प्रमोशन करत असताना एका मुलाखतीत साराला सैफ आणि अमृताच्या झालेल्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने आपण या घटस्फोटाबद्दल आनंदी असून आपलं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. पण माझी आई म्हणजेच अमृता माझं प्रेरणास्थान असल्याचंही साराने सांगितलं. पुढे सारा म्हणाली की मी अनेकदा पाहिलंय की, घटस्फोटानंतर अनेकजण त्यांच्या मुलांमुळे एकत्र राहत असल्याचा दावा करतात. परंतु माझ्या मते जर आई-वडिलच एकमेकांसोबत खुश नाही राहू शकत तर ते मुलांना कसं खुश ठेऊ शकतात. एकमेकांची मतं जुळत नसल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत राहणार तर अशा वातावरणात मुलं कशी आनंदी राहू शकतील ? मला आनंद आहे की, माझ्या आई-वडिलांनी अशा वातावरणापासून मला दूर ठेवत घटस्फोट घेतला.  त्यामुळे आज ते दोघे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत, आणि मलाही दोन आनंदी घराचा सहवास मिळत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Post weekend posing  Pre week pondering  Either way- #nomore #mondayblues #LoveAajKal  @shivangi.kulkarni

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने 'केदारनाथ' 'सिम्बा' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. येत्या व्हॅलेंटाईन म्हणजेच १४ फेब्रुवारी  ला 'लव्ह आज कल -२'  हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कार्तिक आर्यन आणि साराची मुख्य भूमिका असणार आहे. या  चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यानच साराने आपल्या आगामी येणाऱ्या 'अतरंगी रे' या चित्रपटाची घोषणा केली असून यामध्ये सारा अक्षयकुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांच्यासोबत काम करणार असल्याचेही सांगितले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News