कंगनाला पदमश्री जाहीर;आलियाने केलं कौतुक पण.....

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • बॉलीवूडमधील अनेक कलाकारांवर कंगना न पटणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच टीका करत असते. आणि  त्यामुळेच  तिला अनेकांच्या नाराजीला किंवा वादाला सामोरे जावे लागते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी कंगना यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. 

मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत ही कोणत्याही गोष्टीवर आपले ठाम आणि स्पष्ट मत मांडत असते. अलीकडेच 'पंगा' या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान तिने निर्भया प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे कंगना चांगलीच चर्चेत अली होती. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांवर कंगना न पटणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच टीका करत असते. आणि  त्यामुळेच  तिला अनेकांच्या नाराजीला किंवा वादाला सामोरे जावे लागते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी कंगना यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. 

सिनेसृष्टीत आपल्या चांगल्या योगदानाबद्दल भारत सरकारने कंगनाला पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. याच अनेक शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे आलिया भट. वास्तविक पाहता आलिया आणि कंगना यांच्यात  एकदुसऱ्याविषयी नाराजी होती. एका कार्यक्रमात कंगनाने आलियावर तोफ डागली होती. त्यानंतर आलियानेही त्यावर प्रतिक्रिया देत तिला चांगलेच सुनावले होते.परंतु असे सर्व असतानाही हा अबोला मागे करत आलियाने कंगनाला शुभेच्छा दिल्या. 

आकर्षक पुष्पगुच्छ देऊन आलीआयने कंगनाला शुभेच्छा दिल्या असून त्याच्यासोबत एक शुभेच्छापत्रदेखील पाठवलं आहे. हे पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्राचा फोटो कंगनाच्या बहिणीने म्हणजेच रंगोली चंदेल हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. आणि आलियाच्या या शुभेच्छांवर तिच्या बहिणीने दिलेल्या प्रतिक्रियेने  सर्वाना आकर्षित केलं आहे.  यावेळी ती म्हणाली की,कंगनाबद्दल मी फारसं काही सांगू शकत नाही,पण  मला हे सर्व खूप छान वाटत आहे. परंतु यावर कंगनाने आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News