जुनं द्या नवं घ्या ! मोबाईल कंपनीची नवी ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

मेड इन इंडियाची realme कंपनीने आणली आहे. या कंपनीने २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मोबाईल प्रेमींसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स आयोजित केल्या आहेत.

मुंबई: अनेक मोबाईल कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असतात. अशीच एक ऑफर मेड इन इंडियाची realme कंपनीने आणली आहे. या कंपनीने २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मोबाईल प्रेमींसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स आयोजित केल्या आहेत. या ऑफर्सनुसार Realme मोबाईलच्या किमतीवर तुम्हाला आकर्षक सूट मिळणार असून कमी किमतीत जास्त फिचर्स असणारा मोबाईल घेण्याची संधी ही कंपनी तुम्हाला देत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा जुना मोबाइल देऊन नवीन मोबाईलही यावेळी घेऊ शकता. यामध्ये Realme 5 Pro, Realme X, Realme XT, Realme 3 अशा मॉडेल्सच्या मोबाईल खरेदीवर तुम्हाला २००० पर्यंत सूट मिळणार असून काही प्रमाणात कॅशबॅकही मिळणार आहे. 

कॅमेरा घेतायं? तर ही माहिती तुमच्यासाठीचं        आहे...https://www.yinbuzz.com/if-you-take-camera-information-you-23327

या मोबाईलमध्ये पुढील फीचर्स असणार आहेत. 

  • १) Realme 5 Pro- 4 GB (रॅम) आणि 64 GB (इंटरनल मेमरी) तर 8 GB (रॅम) आणि 128 GB (इंटरनल मेमरी), किंमत -(14,999)
  • २) Realme X 4 GB (रॅम) आणि 128 GB (इंटरनल मेमरी) किंमत- (14,999)
  • ३)  Realme XT 4 GB (रॅम) आणि 64 GB (इंटरनल मेमरी) किंमत-(14, 999)

वरील मोबाईलच्या किमतीवर ग्राहकांना २००० रुपयांची सूट मिळनार असून  ही ऑफर १९ ते २२ जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News