परदेशात शिकण्यासाठी उघडे आहेत शिक्षणाचे दरवाजे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

'सनबीम' नावाच्या इन्स्टिट्यूटद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना  इंटरन्स एक्सामबद्दल मार्गदर्शन करून त्यांना करिअरची योग्य दिशा देणारे गजानन मोरे यांची संदीप काळे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या यिनबझने आयोजित केलेल्या युवादिन विशेष उपक्रमानिमित्त घेतलेली विशेष मुलाखत...


 

तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप काय ?
मी २००८ मध्ये 'सनबीम'नावाचं  एक इन्स्टिटयूट उभं केलं. त्यामागील उद्देश हा १२ वि मधील जे विद्यार्थी आहेत. त्यांनी १२ वि नंतर काय करावं ? नेमक्या कोणत्या प्रवेश परीक्षा द्यायच्या तसेच कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन करणे हा होता.  ग्रामीण भागात इंटरन्स एक्सामबद्दल माहिती द्यायचो. त्यांचे अर्ज भरून घेणे, त्याचप्रमाणे प्रवेशासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या इन्स्टिट्यूटने केलं आहे. जेव्हा इन्स्टिटयूटची सुरुवात झाली तेव्हा एकूण ५२ इंटरन्स एक्साम असायच्या आता जवळपास त्या कमी-कमी होत २०२०साली १०पर्यंत आल्या आहेत.औरंगाबाद,लातूर,नांदेड तसेच पुण्यातही आमच्या शाखा आहेत. या शाखा त्या-त्या भागात जाऊन  महाविद्यलयांना इंटरन्स एक्सामबद्दल मार्गदर्शन करतात 

जास्त फीसमुळे मेडिकल शिकणाऱ्यांचे स्वप्न अधुरे राहते यासाठी तुम्ही कशी मदत करता ?
 मेडिकलमधील प्रवेश हा मेरीटवर अवलंबून असतो. यामध्येच काही वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. मार्क्स जास्त असतील तर गव्हर्मेन्ट महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो आणि जर मार्क्स कमी असतील तर सेमी गव्हर्मेन्ट महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. परंतु ज्यांचं मेरिटमध्ये नाव येत नाही असे विद्यर्थी परदेशातील मेडिकल संस्थेत कमी फीस मध्ये प्रवेश मिळवू शकतात.  त्याचप्रमाणे आम्ही विद्यर्थ्यांना पडलेल्या मार्क्सवरून त्यांना योग्य तो प्रवेश मिळवून देतो. 

पालक आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा कसा अनुभव आला ?
प्रत्येक पालकांना वाटत की माझ्या मुलाला एमबीबीएस ला प्रवेश मिळावा असं वाटत असत. पहिल्या फेरीत नाही मिळाला प्रवेश तर दुसऱ्या फेरीत मिळेल अशी पालकांची मानसिकता असते परंतु आम्ही अशा परिस्थिती विद्यर्थी आणि पालकांच्या विचारात समन्वय साधून योग्य ते मार्गदर्शन करतो म्हणजेच जर एमबीबीएसला प्रवेश नाही मिळाला तर बीडीएसला प्रवेश मिळेल किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्यासाठी  त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न आम्ही त्यांच्याशी बोलून करतो 

विदयार्थ्यांच्या प्रवेशानंतर त्यांना शिक्षणात येणाऱ्या पुढील अडचणींसाठी  तुम्ही कसं मार्गदर्शन करता ?
 प्रवेशानंतर शैक्षणिक स्तरावर अनेक अडचणी येत असतात त्यामध्ये रजिस्टरेशन असो किंवा मग शिष्यवृत्तीचा विषय असो यासाठी आमच्याकडून होणारे योग्य ते सर्व प्रयत्न आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी येणाऱ्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहचवत असतो

तुमच्या या कामाबद्दल विदयार्थ्यांच्या प्रतिक्रिया कशा येतात ?
विद्यर्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी बऱ्याच अडचणी येतात त्यांना त्यांच्यासाठी  योग्य ते कॉलेज मिळत नाही मार्गदर्शन मिळत नाही ते आम्ही करतो त्यामुळे विदयार्थी आमच्या कामाला घेऊन समाधानी आणि आंनदी आहेत अशाच सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला येतात

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News