सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाताय? तर जरुर वाचा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020
  • मोबाईलच्या होणाऱ्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहेत. परंतु इतर मोबाईल वापर करणाऱ्यांच्या तुलनेत टॉयलेटच्या वेळी मोबाईल वापरणाऱ्यांना जास्त आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

अन्न, वस्त्र निवारा याप्रमाणेच मोबाईलही लोकांची मूलभूत गरज बनली आहे. मोबाईल वापराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसातला जास्तीत जास्त वेळ हा मोबाईलवर घालवला जातो. म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईलचा वापर केला जातो. त्यापेक्षा पुढे जाऊन पाहिले तर बऱ्याच प्रमाणात काही लोक टॉयलेटला जाताना मोबाईल घेऊन जातात. व्हर्जन वायरलेस यांनी २०१५ मध्ये केलेल्या संशोधनानुसार १० पैकी ९ लोक टॉयलेटला जाताना मोबाईल घेऊन जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाइल्सचा आजार होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. 

बाथरूममध्ये मोबाईल घेऊन गेल्यावर कमोडवर बसून मोबाईल वापरताना लाेकं जास्त वेळ व्यस्त राहतात  त्यामुळे त्यांच्या पार्श्वभागावर ताण पडू शकतो,याचाच परिणाम म्ह्णून पुढील काही काळात इतर समस्यांबरोबरच पाइल्ससारखा भयंकर आजार होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.

मोबाईलच्या होणाऱ्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहेत. परंतु इतर मोबाईल वापर करणाऱ्यांच्या तुलनेत टॉयलेटच्या वेळी मोबाईल वापरणाऱ्यांना जास्त आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News