मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अभिनयाबरोबरच फिटनेसमुळेही प्रसिद्ध आहे. बाजीगर,धडकन,रिश्ते,मैं खिलाडी तू अनाडी' यांसारखे अनेक हिट चित्रपट शिल्पा शेट्टीने दिले आहे. परंतु गेली १२ वर्ष शिल्पाने एकही चित्रपटात काम केलं नसून ती चित्रपटसृष्टीपासून दूर असल्याचे दिसून आले. याच कारणामुळे तिचे चाहतेही नाराज होते. शिल्पा शेट्टी पुन्हा चित्रपटात केव्हा दिसणार? याची आतुरता प्रेक्षकांना होती. परंतु आता ही आतुरता आता संपली आहे.
शिल्पा शेट्टी आता १२ वर्षांनंतर चित्रपटात दिसणार आहे. आगामी 'हंगामा २'या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत कमबॅक करणार असलयाचे सांगितले जात आहे. या चित्रपटातून तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे. २५ वर्षांपूर्वी 'चुरा के दिल मेरा...' या गाण्यावर थिरकली होती १९९४ सालच्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीवर हे गाणं चित्रित झालं होतं. त्यावेळी शिल्पाने या गाण्यातून आणि आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. याच गाण्यावर आता शिल्पा पुन्हा थिरकणार आहे. 'हंगामा २'या चित्रपटातुन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सचित्रपटासाठी हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे.
शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिताने .चित्रपटाच्या निमित्ताने शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले. चित्रपट यशस्वी व्हावा आणि मला १२ वर्षांनंतर चित्रपटात काम करायला मिळत असल्याने मी बाबांचे आभार मनात असल्याचे शिल्पाने सांगितले