'या' मराठी चित्रपटाला हॉलीवूड टच...!

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

सशक्त कथा आणि उत्तम सादरीकरण ही मराठी चित्रपटांची खासियतच आहे. आता यापलीकडेही मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडणार आहे.

‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांनी त्यांच्या आगामी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. फक्त घोषणाच नव्हे; तर या  चित्रपटाने सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे.

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. म्हणजेच मराठी चित्रपटाला एक हॉलीवूडपटाचा टच मिळणार आहे. ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मिती संस्थाही या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय; तर दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटांमधून समृद्धीने प्रेक्षकांना अनोखा संदेश दिला. आता ती तिच्या चौकटीबाहेर जाऊन प्रेक्षकांसाठी नवा विषय घेऊन येणार आहे. या चित्रपटात नेमके कोणकोणते कलाकार झळकणार, हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News